सोलापूर : सोलापू-पुणे महामार्गावर शहराजवळ असलेल्या बाळे पुलावर डंपरचालकाने अचानकपणे ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या चार वाहनांनी धडक दिली. या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. शिंदे गट शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल शिंदे यांनी नागरिकांची बाजू घेत महामार्गावर राडा केला.
Crime News: आजीने पूजेसाठी फुलं आणायला पाठवलं, काही वेळात नात रडत-रडत आली घरी; विचारताच कुटुंब हादरलं…
अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर नागरिकांनी भर रस्त्यात मृतदेह समोर ठेवून ठिय्या आंदोलन केल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद हे नागरिकांची आणि शिवसेना पदाधिकऱ्यांची समजूत घालत होते. सुप्रिया नरखेडकर (वय ३६ वर्ष, रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. यानंतर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत नागरिकांची समजूत घातली व जखमींना उपचारासाठी दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला.
सोलापुरात वाळू माफियांचा उच्छाद; ग्रामपंचायत सदस्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, अजूनही कोमात
डंपर अचानक रस्त्यावर थांबला अन् मागून कार धडकली

पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी या घटनेची माहिती दिली. सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूर शहराजवळ बाळे पुलावर शुक्रवारी दुपारी अचानकपणे डंपरचालकाने ब्रेक मारला आणि वाहन थांबवले. यामुळे मागून येणारी स्विफ्ट डिझायर कार जोरात डंपरला धडकली. यामुळे कारमध्ये बसलेली महिला सुप्रिया नरखेडकर यांचा जागीच मृत्यू झाला. कार मागे असलेल्या दुचाकीचालकाचेही नियंत्रण सुटले आणि त्याने कारला मागून धडक दिली. या अपघातामुळे सोलापूर-पुणे महामार्गावरी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

दारुबंदीवरून भाजपच्या सुभाष देशमुखांना पुन्हा संतप्त महिलांचा घेराव, आमदार महोदयांचा एसपींना फोन

शिवसेना जिल्हाध्यक्षांचा भर रस्त्यात राडा

शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अमोल बापू शिंदे हे देखील अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले. डंपर चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करा, तसेच त्याला अचानकपणे ब्रेक मारायला लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत त्यांनी नागरिकांची बाजू घेतली. यावेळी अमोल शिंदे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्याने डंपर चालकाने डंपर थंबवला, असा आरोप यावेळी नागरिक करत होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here