कोल्हापूर : महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी धरण ओळखले जाते. सध्या या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने येथील ऐतिहासिक ठिकाण पर्यटनासाठी खुले झाले आहे. ‘बेनजर व्हिला’ असे या ऐतिहासिक ठिकाणाचे नाव असून हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करू लागले आहेत.राजश्री शाहू महाराजांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प

छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पामधील एक प्रकल्प म्हणून राधानगरी धरणाचा समावेश होतो. कोल्हापूर संस्थानमधील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी राजश्री शाहू महाराजांनी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. यामुळेच इतक्या वर्षानंतरही हे धरण संपूर्ण कोल्हापूरची तहान भागवत आहे.

एका बाजूला हे भलं मोठं धरण असताना साक्षीदार म्हणून म्हणून येथील ‘बेनजर व्हिला’ कडे पाहिले जाते. राधानगरी धरणातील एका बेटावर उभा असलेला हा ‘बेनजर व्हीला’ ३ वर्षानंतर पुन्हा खुला झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आता याकडे वळत आहेत. हा बेनजर व्हिला धरणाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर आहे. यामुळे पाणी कमी होते तेव्हाच याठिकाणी जाता येते. परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने हा व्हिला पाहण्यासाठी याठिकाणी येत असतात. सध्या या वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असली तरी ही शाहूकालीन वास्तू पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत आहेत.
EDच्या रडारवर असलेल्या हसन मुश्रीफांच्या पोस्टरवर CM शिंदे, फडणवीसांचा फोटो, चर्चांना उधाण
छोट्या बेटावर अतिशय देखणी अशी वास्तू

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी पाण्याचे महत्त्व ओळखून राधानगरी धरण बांधण्याला प्राधान्य दिले. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी धरण ओळखले जाते. केवळ ७ टीएमसी साठवणूक क्षमता असले तरीही हे धरण संपूर्ण जिल्ह्यासाठी एक मोठे वरदान ठरले आहे. १९१० ला या धरणाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. तेव्हाच या धरणाच्या मधोमध असलेल्या छोट्या बेटावर अतिशय देखणी अशी एक वास्तू उभारण्यात आली. त्याचे नाव आहे ‘बेनजर व्हिला’ आहे. त्याला काहीजण ‘बेनझीर व्हिला’ असेही काहीजण बोलतात.
सतेज पाटलांचं ठरलं! कोल्हापूर लोकसभेत कुणाचा कंडका पडणार? मंडलिक की महाडिक?
राधानगरी धरणाचे बांधकाम हे दीर्घकालीन चालणार होते. यामुळे धरण बांधकाम देखरेखी खाली राहावे यासाठी अनेकवेळा शाहू महाराज स्वतः याठिकाणी वास्तव्यासाठी असायचे. शिवाय बांधकामावेळी ज्या-ज्या तज्ज्ञ आणि महत्त्वाच्या व्यक्तींनी यासाठी योगदान दिले ते सुद्धा याठिकाणी वास्तव्यासाठी असायचे.

कोल्हापूरात खरिपातील 90 टक्के पेरण्या खोळंबल्या; पाऊस लांबणीवर,तर शासनानं पाठ फिरवली, बळीराजाचे डोळे आकाशाकडे

पर्यटकांना काय पाहायला मिळेल?

२०१९ मध्ये राधानगरी धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने ‘बेनजर व्हिला’ हा पर्यटकांसाठी खुला झाला होता. त्यानंतर आता हा व्हिला खुला झाला आहे. या ऐतिहासिक बेनजर व्हिलाला १०० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटकाला राऊतवाडी धबधब्या पाशी असलेल्या गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतर आतमध्ये चालत जावं लागतं. या वास्तूमध्ये प्रवेश करताच पहिल्यांदा मध्यभागी मोठे सभागृह लागते. तर बाजूला दोन शयन कक्ष आहेत. तर एका बाजूला छोटे स्वयंपाक गृह आणि दुसऱ्या बाजूला एक मोठं स्वयंपाक गृह आहे. काही अंतरावर अन्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी छोटी निवासस्थान तयार केल्याचे पाहायला मिळते. खरंतर अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची गरज आहे. मात्र अशा या वास्तूकडे शासनाला लक्ष देता येत नाही ही खेदाची बाब आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि नेहमी शाहूंची आठवण करून देणाऱ्या या वास्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची त्वरित डागडुजी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here