नवी दिल्ली: वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सोशल मीडिया कंपनी फेसबुकने () आज शुक्रवारी आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिले आहे. आमचे कोणत्याही पक्षाशी काहीही देणेघेणे नसून, नेत्यांकडून करण्यात येणारा आक्षेपार्ह मजकूर आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे काम सुरूच ठेवू, असे फेसबुकने स्पष्ट केले आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या पोस्टना फेसबुकने ‘हेट स्पीच’चे नियमा लागू केले नाहीत असा फेसबुकवर आरोप करण्यात आला आहे. फेसबुकच्या मजकुराच्या धोरणाचे (कंटेंट पॉलिसी) भारतात तटस्थपणे भेदभाव न करता पालन केले जात नाही आणि भारतीय जनता पक्षाबाबत नरमाईची भूमिका दाखवली जात आहे, असा आरोप द वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत आरोप करण्यात आला होता. या नंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षात संघर्ष सुरू झाला.

इंडियाने उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी ब्लॉग लिहिला आहे. ब्लॉगमध्ये ते म्हणतात, ‘फेसबुक हे खुले आणि पारदर्शी प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म कोणत्याही विचारधारेचे समर्थन करत नाही. या प्लॅटफॉर्मवर आपले विचार व्यक्त करण्याचे लोकांना स्वातंत्र्य आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्यावर आमचे धोरण लागू करण्यात पक्षपात करत असल्याचा आरोप झाला. आम्ही हा आरोप गंभीरतेने घेत आहोत आणि आम्ही द्वेष आणि कट्टरतेच्या प्रत्येक प्रकराचा निषेध करतो.’

कम्युनिटी स्टँडर्डचे कठोरपणे पालन

मोहन यांनी पुढे म्हटले की, फेसबुकवर लोड होणाऱ्या मजकुराबाबत फेसबुकचे धोरण निष्पक्षपातीपणाचेच राहिलेले आहे. आम्ही कम्युनिटी स्टँडर्डचे कठोरपणे पालन करत आहोत. यात राजकीय स्थिती, विचारधारा किंवा धार्मिक आणि सांस्कृतिक विश्वासाचा कधीही पर्वा करत नाही. आम्ही नेत्यांद्वारे केलेला आक्षेपार्ह मजकुर आमच्या प्लॅटफॉर्मवरून हटवला असून पुढे देखील आम्ही हे करत राहू.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here