: कर्नाटकतील बेळगाव जिल्ह्यातील खिळेगाव येथील प्रेमी युगुलाने कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील शेळी मेंढी फॉर्ममधील झाडाला एकाच नायलॉन दोरीने एकत्रित गळफास घेऊन केल्याची घटना शुक्रवारी (ता. २१) दुपारी उघडकीस आली. आकाश मनोहर जाधव आणि उज्ज्वला बाजीराव हुल्ले अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहते. ते दोघेही विवाहीत होते. या दोघांनीही आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.

कवठेमहांकाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणी येथे कर्नाटकातील प्रेमीयुगुलाने झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रांजणी येथील अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी फॉर्मचे प्रभारी व्यवस्थापक शहाजी पाटील यांनी या घटनेची माहिती पोलिसात दिली. यातील दोघेही मृत व्यक्ती विवाहित असून, त्यांना दोन लहान मुले आहेत. मृत महिला उज्ज्वला हुल्ले ही माहेरी आई-वडिलांकडे रहात होती. आकाश जाधव आणि उज्ज्वला हे दोघे गुरुवारी दुपारी घरातून बाहेर पडले होते. त्यांनी शुक्रवारी शेळी मेंढी फॉर्ममधील एका झाडाला एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आकाश जाधव व उज्ज्वला हुल्ले यांचे काही महिन्यांपासून प्रेम सबंध होते. आकाश जाधव यांने वडिलांना फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, हवालदार संतोष बेंबडे, दादासाहेब ठोंबरे, अविनाश शिंदे हे तातडीने घटनास्थळी पोहचले. कवठेमहांकाळ पोलिसांनी पंचनामा केला असून, पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here