कल्याण: कल्याणमध्ये करोनाचा संसर्ग वाढलेला असतानाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पीपीई किट घालून थेट कोविड वॉर्डात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी करोना बाधितांची जवळ जाऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय ऊर्फ बंड्या साळवी आणि केडीएमसीचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना करोनाची लागण झाली आहे. यांच्यावर कल्याणच्या मीरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी आज थेट गाठले. मीरा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अंगावर पीपीई किट चढवले आणि थेट विजय साळवी उपचार घेत असलेल्या वॉर्डात गेले. यावेळी त्यांनी तब्येत कशी आहे? काही त्रास होतो का? अशी साळवी यांना विचारपूस केली. त्यावर मला श्वास घ्यायला थोडा त्रास होतो, असं साळवी म्हणाले. तेव्हा शिंदे यांनी साळवी यांच्या खांद्यावर हात ठेवत तू आता बरा होत आला आहे. मी डॉक्टरांशी बोललो. तुझी प्रकृती चांगली होत असून लवकरच तुला डिस्चार्जही मिळेल, असा धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच साळवी यांनी त्यांच्या आईची तब्येतही चांगली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आणि साळवींना बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

शिंदे यांनी यावेळी साळवी यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचे का? असा प्रश्नही केला. त्यावर साळवी यांनी नकार दिला. साळवी यांची विचारपूस केल्यानंतर शिंदे यांनी इतर रुग्णांचीही विचारपूस करून डॉक्टरांशीही चर्चा केली.

दरम्यान, आज राज्यात १४ हजार १६१ नवीन रुग्ण सापडले असून ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ११ हजार ७४९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आजच्या नव्या आकडेवारीमुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५०वर गेली आहे. तर मृतांचा आकडा २१ हजार ६९८ झाली आहे. राज्यात आज ११ हजार ७४९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने राज्यातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख ७० हजार ८७३ झाली आहे. राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के झाले आहे. तर राज्यातील करोना रुग्णांच्या मृत्यूचा दर ३.३० टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ९२ हजार ९६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ही संख्या १८.८२ टक्के एवढी आहे. राज्यात सध्या ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वॉरंटाइन आहे. तर ३५ हजार १३२ लोक संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here