नवी दिल्ली: वादाच्या भोवऱ्यात भारत आणि चीन (India-China Conflict) या दोन देशांदरम्यानचा तणाव अजूनही कायम आहे. चीनच्या कारवायांमुळे हा तणाव न निवळता तो अधिकच वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता भारताने चीनच्या विरुद्ध आणखी एक मोठे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे.

व्हिसाबाबत लावणार प्रतिबंध

आता भारताने चीनी व्हिसासंदर्भात अतिरिक्त तपास आणि स्थानिक विद्यापीठांशी कनेक्शन आहे का याचा तपास सुरू केला आहे. भारताने आता चीनला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी चारही बाजूंनी घेरणे सुरू केले आहे. चीनी व्यापारी, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगातील विशेषज्ञ आणि वकिलांच्या समूहांच्या व्हिसासाठी आता पूर्व सुरक्षा मंजुरीची आवश्यकता असेल असा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले.

अधिकाऱ्याने केला खुलासा

चीनी संस्थांसोबत भारतीय विद्यापीठांच्या व्यवहारांवर आता मोठे अडसर निर्माण होण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. सरकार भारतीय तंत्रज्ञान संस्था, बनारस हिंदू विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठासह इतर शैक्षणिक संस्थांनी केलेल्या ५४ करारांची समीक्षा करत आहे. या बरोबरच जगभरात कन्फ्यूशियस संस्थेकडून चालवले जाणारे आणि हनबनच्या रुपात ओळखले जाणारे चीनी भाषा प्रशिक्षण कार्यालयाचे कोठे कोठे संबंध आहेत याचाही तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनी संस्थांसोबतचे संबंध तुटणार

चीनी भाषेचा पाठ्यक्रम सोडून चीनी संस्थांसोबत असलेले संबंध तुटण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व संस्थांचा उपयोग नीतीधोरणाचे निर्माते, विचारवंत, राजकीय पक्ष, कॉर्पोरेट्स आणि शिक्षणतज्ज्ञांना प्रभावित करण्यासाठी केला जातो.

क्लिक करा आणि वाचा-

एफबीआयने देखील दिला होता इशारा

चीनच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करणारा भारत जगातील पहिला देश नाही. या पूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ने अशी पावले उचलली आहेत. जुलैच्या सुरुवातीला अमेरिकेची गुप्तचर संथ्या एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर रे यांनी देखील अमेरिकेसाठी चीन हा सर्वात ‘मोठा’ धोका असल्याचे म्हटले होते. तसेच या पूर्वी अमेरिकेच्या एफसीसीने देखील चीनच्या हुवावे आणि झेडटीईचा उल्लेख राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘धोका’ असल्याचे म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here