नवी दिल्ली: अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या शवविच्छेदन अहवालाचा (Postmortem Report) तपास करण्यासाठी सीबीआयने एम्सच्या डॉक्टरांचे पथक तयार केली आहे. या पथकात एम्सच्या चार डॉक्टरांचा समावेश आहे. डॉक्टरांच्या या पथकाचे नेतृत्व डॉ.सुधीर गुप्ता करणार आहेत. डॉक्टरांची ही टीम सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी केल्यानंतर त्याबद्दल आपले मत देईल. हे मत तपासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरेल असे बोलले जात आहे.

सीबीआयने डॉक्टरांच्या या पथकाला सुशांतसिंहचा पाठविला आहे. या अहवालासह केमिकल रिपोर्ट देखील पाठवण्यात आला आहे. या शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टरांचे पथक मुंबईला जाणार आहे.

डॉ सुधीर गुप्ता हे मधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. डॉ सुधीर गुप्ता यांना देशातील अनेक जटील खून प्रकरणांच्या तपासाचा अनुभव आहे. डॉ सुधीर गुप्ता यांनी सुनंदा पुष्कर, शीना बोरा प्रकरणातील शवविच्छेदन अहवालांची चौकशी केली आहे.

यांनी यापूर्वी सीबीआयसोबत बर्‍याच प्रकरणांमध्ये काम केले आहे. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची चौकशी सीबीआय करीत होती. या प्रकरणातही डॉ. सुधीर गुप्ता यांनी सीबीआयबरोबर काम केले आहे. या व्यतिरिक्त, डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दिल्लीच्या हाय प्रोफाइल हत्याकांड प्रकरणाच्या चौकशीतही आपले योगदान दिलेले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख असल्याने डॉ. सुधीर गुप्ता यांनी सीबीआयला देशातील अनेक हायप्रोफाईल प्रकरणांची चौकशी करण्यात मदत केली आहे. यामध्ये पत्रकार निरुपमा पाठक प्रकरण, पत्रकार शिवानी भटनागर हत्या प्रकरण, नितीश कटारा खून खटल्याचा समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here