पुणे : पुण्यात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सेक्सटॉर्शनमध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. मात्र, पुण्यातल्या एका नामांकीत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकाचे व्हिडिओ चित्रित करून तिच्या पतीला तो व्हिडिओ पाठवत व्हायरल करण्याची धमकी दिली. या बदल्यात तरुणाने असं काही माहितलं की यामुळे पोलीसही हैराण आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने व्हिडिओ शूट करून शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्यासाठी तो व्हिडिओ तिच्या नवऱ्याला पाठवला. या बदल्यात विद्यार्थ्यांने पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. पती-पत्नीने तत्काळ हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणाची तक्रार दिली. यानंतर मयांक सिंग (२६, रा.पटणा, बिहार, सध्या पुणे) याच्याविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Rains: मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस सुरू; पुढच्या २४ तासांत या भागांना IMD कडून येलो अलर्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित प्राध्यापिकेचा आरोपी हा विद्यार्थी आहे. तो मयंक सिंग या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या संपर्कात नेहमी असायचा. यानंतर तो मोबाईल आणि व्हॉटसअप कॉलवरुन त्यांच्या संपर्कात राहू लागला. यानंतर त्याने एकदा पीडितेला व्हिडीओ कॉल करुन ‘मी सांगतो तसे केले नाही तर, मी तुमची आपल्या विद्यापीठात आपल्यात झालेले बोलणं दाखवून बदनामी करेल’ अशी धमकी दिली. मात्र, घाबरून आरोपी सांगेल तसे करायला तयार झाली.

आरोपीने प्राध्यापिकला अंगावरचे कपडे काढण्यास सांगितले व त्याने ते शूटिंग रेकॉर्ड केले. यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या एका आयडीवरून पीडिता आणि तिच्या पतीला पाठवण्यात आला. हा व्हिडिओ सगळीकडे पाठविण्याची धमकी देत ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी करण्यात आली. या बाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले करत आहे.

Mumbai News: मुंबईच्या दवाखान्यात पालिकेचं स्टिंग ऑपरेशन, डमी पेशंट पाठवला; सत्य पाहून अधिकारी हादरले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here