विधी मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे राजीवकुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केल्याची माहिती दिली. राजीव कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नेमणूक झाल्याने राष्ट्रपती आनंदी झाले आहेत. अशोक लवासा यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयुक्त म्हणून राजीवकुमार निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होतील, असे विधी मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे.
सुनील अरोरा हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर सुशीलचंद्र हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. राजीवकुमार हे आता दहा दिवसांनंतर या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकात सहभागी होणार आहेत.
राजीवकुमार यांना सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचा ३० वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी बीएससी आणि एलएलबीसह पब्लिक पॉलिसी अँड सस्टेनिबिलिटी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. राजीवकुमार यांना गेल्या वर्षी जुलै महिन्यात वित्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
क्लिक करा आणि वाचा-
त्यांचा कार्यकाळ यावर्षी फेब्रुवारीमध्ये संपला होता. राजीव कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समावेशनाच्या योजनांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना आणि मुद्रा कर्ज योजना यांसारख्या प्रमुख योजनांचा समावेश आहे.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thanks so much for the blog post.
Thanks so much for the blog post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.