पुणे : पुणे शहरात पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाच्या सुरवातीलाच धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडी तारेच्या कंपाऊंडला एका तरुणाचा हात लागल्याने त्याला विजेचा शॉक बसून त्याचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या निम्मिताने महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील कोंढवा परिसरात ही घटना घडली असून, शनिवार असल्याने शाळा बंद होती अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता होती. या घटनेने महावितरणच्या भोंगळ कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव अजयकुमार शर्मा असे असून तो विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. कोंढवा परिसरात अजयकुमार कामानिमित्त तिथून जात होता. त्याला अचानकपणे त्या तारांना धक्का लागला. त्याला जोरात शॉक बसला. यात त्याचा मृत्यू झाला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे एक कुटुंब वाऱ्यावर आले आहे.
मात्र, याबाबत महावितरण विभाग कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नसून पोलिसदेखील तक्रार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे माझ्या भावाला न्याय द्यावा अशी मागणी अजयकुमार शर्मा यांच्या भावाने केली आहे.