नवी दिल्ली: दिल्ली रेल्वे स्थानकावर रेल्वेचा मोठा निष्काळजीपणा समोर आला असून, यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही महिला स्टेशनला जात असताना रस्त्यात पावसाचं पाणी साचलं होतं. साचलेल्या पाण्यातून जाण्याचं टाळण्यासाठी महिलेने विजेच्या खांबाचा आधार घेतला आणि तिथेच घात झाला. त्याच खांबातून विजेचा धक्का बसला. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने महिलेला रुग्णालयात नेले, मात्र तिला वाचवण्यात यश आलं नाही. रेल्वेसह पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या प्रीत विहारमध्ये राहणारी साक्षी आहुजा नावाची महिला पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती. महिलेसोबत आणखी दोन महिला आणि ३ मुले होती. साक्षीला शताब्दी ट्रेनने भोपाळला जायचे होते. रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने रेल्वे स्थानकाभोवती पाणी तुंबलेलं होतं.

पायल तुमची; माझ्या लेकीला सांभाळा, इतकं लिहून विवाहितेने मृत्यूला जवळ केलं, धडकी भरवणारं कारण
आधार घेण्यासाठी खांबाला पकडले तिथेच घात झाला

रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना साचलेलं पाणी टाळण्यासाठी महिलेने विद्युत खांबाचा आधार घेतला. यादरम्यान, महिलेला विजेचा जोरदार झटका बसला आणि महिला तिथेच कोसळली. हा प्रकार आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. खबरदारी घेत लोकांनी महिलेला खांबापासून वेगळे केले आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, या महिलेने रुग्णालयातच जीव सोडला.

पावसामुळे पाणी साचलेले

दिल्ली रेल्वे स्थानकाभोवती पावसामुळे पाणी साचल्याचे लोकांचे म्हणणे आहे. येथे विद्युत खांबाभोवती पाणी तुंबले होते. साक्षी आहुजा खांबाजवळूनच जात होती. साक्षीने आधार घेण्यासाठी खांबाला पकडताच तिला विजेचा जोरदार धक्का बसला. खांबाजवळ उघड्या विद्युत तारा होत्या, त्यामुळे पोलमध्ये करंट आल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेने खांबाला स्पर्श केला असता तिला विजेचा धक्का बसला.

याप्रकरणी सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात कोणाचा निष्काळजीपणा होता, याचा तपास रेल्वेसह पोलिस करत आहेत. माहितीनंतर फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेबाबत आयपीसी कलम २८७/३०४ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) दीपक कुमार यांनी सांगितले की, पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. असे दिसते की केबलमधून इन्सुलेशन फेलियरमुळे करंट लीक झाल्यामुळे ही घटना घडली आहे. रेल्वेच्या कार्यप्रणालीत कोणतीही कमतरता नाही. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी तपास करण्यात येत आहे. अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून दिल्ली विभागात विद्युत सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here