मुंबई : बँकिंग आणि ऊर्जा स्टॉक्सच्या नेतृत्वात बेंचमार्क निर्देशांकांनी शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सकारात्मक कामगिरी दर्शवली. बाजार बंद होताना निफ्टी ५९.४० अंकांनी वाढला व तो ११,३७१.६० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई २१४.३३ अंकांनी वधारला व ३८,४३४.७२ अंकांवर स्थिरावला.

बाजारात सकाळपासून विक्रीचा मारा सुरु होता. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली. भांडवली बाजारातील नकारात्मक पडसाद चलन बाजारावर उमटले. मात्र शुक्रवारी अमेरिकी डॉलरची इतर देशांच्या चलनांसमोर घसरण झाली. त्याचा भारतीय चलनाला फायदा झाला. देशांतर्गत भांडवल बाजार शुक्रवारी सक्षम झाल्यामुळे विदेशी चलन बाजारातही उत्साह संचारला. त्याचा परिणाम म्हणून भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १८ पैसे वर गेला. एका अमेरिकी डॉलरसाठी ७४.८३ रुपे मोजावे लागले.

आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया डॉलरच्या (ग्रीनबॅक) तुलनेत ७४.८३ वर बंद झाला. गुरुवारी रुपया ७५.०२ या पातळीवर बंद झाला होता. विदेशी चलन बाजार उघडला तेव्हापासून डॉलरच्या रुपयातील दरामध्ये चढउतार दिसून आले. रुपया ७४.८४ ते ७४.९६ यामध्ये हिंदोळत राहिला. एकूण सहा चलनांचा मिळून बनलेला डॉलर निर्देशांक ०.१७ टक्के वधारत ९२.९५ या पातळीवर स्थिरावला.

शुक्रवारच्या सत्रात एनटीपीसी ५.०९ टक्के, पॉवरग्रिड ४.६४ टक्के, एशियन पेंट्स ४.४३ टक्के, हिरो मोटोकॉर्प २.४३ टक्के आणि एचडीएफसी बँक २.५२ टक्के हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. झी एंटरटेनमेंट ३.७१ टक्के आणि हिंडाल्को १.६१ टक्के, ओएनजीसी १.१० टक्के, भारती एअरटेल १.२५ टक्के आणि टाटा स्टील ०.९९ टक्के हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप ०.५७ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅपने १.४१ टक्के वृद्धी दर्शवली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.

कोव्हिड-१९ साथीमुळे आर्थिक सुधारणांभोवतीच्या चिंता वाढत असल्याने प्रमुख तेल निर्मात्यांनी उत्पन्नात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तेलाच्या किंमतीत वाढ दिसून आली. वाढत्या करोना व्हायरसच्या रुग्णांमुळे युरोपातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली. ‘एफटीएसई १००’चे शेअर्स ०.१५ टक्क्यांनी घसरले. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.३४ टक्क्यांनी घसरले. वॉलस्ट्रीटवर टेक संचलित वृद्धी दिसून आल्यानंतर आशियाई बाजाराने उच्चांकी व्यापार केला. नॅसडॅकने १.०६ टक्के, निक्केई २२५ ने ०.१७ टक्के आणि हँगसेंग कंपनीच्या शेअर्सनी १.३० टक्क्यांची वृद्धी नोंदवली.

इंडिया रेटिंग्स आणि रिसर्चने जिंदाल ‘स्टेनलेस लिमिटेड’चे रेटिंग स्थिर आउटलुकसह ८८८ रुपयांवर केल्यानंतर कंपनीचा शेअर ८.९७ टक्क्यांनी वाढला आणि ५१.६५ रुपयांवर बंद झाला. तर इंडियन ओव्हरसिज बँकेने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहित निव्वळ नफा १२० कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न ९.६ टक्क्यांनी वाढले. परिणामी इंडियन ओव्हरसिज बँकेचा शेअर २.६३ टक्क्यांनी वाढला आणि तो ११.७० रुपयांवर बंद झाला. ग्लोबल रिसर्च बँक सीएलएसएने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरचे ३१० रुपये या नव्या उद्दिष्टावर खरेदीचा निर्णय कायम ठेवला. परिणामी बँकेचा शेअर १.७२ टक्क्यांनी वाढला आणि तो १९८.१० रुपयांवर बंद झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here