Mumbai Police : मुंबईत पोलिसांनी नियमितपणे राबवलं जाणारं ऑपरेशन ऑलआउट हाती घेतलं होतं. यावेळी पोलिसांनी तब्बल सहा हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी ३३९ जणांची धरपकड झाली.
हायलाइट्स:
- जवळपास ३३९ जणांची धरपकड
- फरार, नशेबाज, तडीपार आरोपींचा समावेश
- मुंबईत ऑपरेशन ऑलआउट
मुंबईत सण-सोहळे, राष्ट्रीय दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने नियमितपणे ‘ऑपरेशन ऑलआउट’ हाती घेतले जाते. या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे ऑनड्युटी असतात. त्यानुसार शनिवारी पोलिसांनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून २३५ रेकॉर्डवरील आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्ह्यांच्या गांभीर्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ड्रग्ज बाबतच्या कारवायांवरही पोलिसांनी विशेष भर देत ड्रग्ज सेवन, विक्री, तस्करी करणाऱ्यांवर १९ गुन्हे दाखल करून २८ आरोपींना अटक केली. तडीपार असलेल्या ४८ आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांची संख्या मुंबईत अधिक आहे. अशा नागरिकांना शोधण्यासाठी ६०९ हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने ५०७ संवेदनशील ठिकाणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी २६ गुन्हे दाखल करून २८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २८ शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. दारू आणि जुगाराच्या ३४ अवैध धंद्यांवर धाडी टाकून ते उद्ध्वस्त करण्यात आले.
सहा हजार वाहनांची तपासणी
मुंबईत १०५ ठिकाणी नाकाबंदी लावून पोलिसांनी ५९२७ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली. यामध्ये मोटार वाहन कायद्यान्वये १९९५ चालकांवर कारवाई करण्यात आली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.