लॉस एंजेलिस: ५० बलात्कार आणि १३ हत्या करणारा दोषी ‘गोल्डन स्टेट किलर’ माजी अमेरिकन पोलिसाला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेदरम्यान त्याची पॅरोलवरही सुटका करण्यात येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टान निकाल देण्यापूर्वी दोषी पोलीस अधिकाऱ्याने पीडितांची, त्यांच्या कुटुंबीयाची माफी मागितली.

जोसेफ जेम्स डीअॅंजेलो असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने याआधीच केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याने हे सगळे गुन्हे ७० आणि ८० च्या दशकात केले असल्याची कबुली दिली होती. शिक्षा सुनावताना कोर्टात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी पक्षकारांसह पीडितांचे कुटुंबीय, पत्रकारांचीही गर्दी होती. कोर्टात दोषी जोसेफ जेम्स डीअॅंजेलोने उभे राहून पीडितांच्या दिशेने पाहत माफी मागितली. मी केलेल्या कृत्यांची माफी मागत असून माझ्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागत असल्याचे त्याने म्हटले. जोसेफ जेम्स डीअॅंजेलोचे वय ७४ आहे. त्याला १३ खूनाच्या आरोपांखाली ११ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये त्याची पॅरोलवरही सुटका करण्यात येणार नाही. दोषी जोसेफने १९७९ मध्ये तीन हत्या केल्या असल्याचे समोर आले.

वाचा: अशी झाली अटक

दोषी जोसेफ जेम्स डीअॅंजेलोला २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास तीन दशकानंतर ‘गोल्डन स्टेट किलर’ सीरियल किलरला अटक करण्यात पोलिसांना यश आले. गु्न्हा घडलेल्या ठिकाणांच्या डीएनएच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. त्याला अटक करण्याच्या चार महिन्याआधी एफबीआय अधिकारी पॉल होल्स यांनी बलात्कार प्रकरणातील डीएनए हा डेटाबेसमधील डीएनएशी जुळवून पाहिला. जवळपास १० जणांचे डीएनए गुन्ह्याच्या घटनेतील डीएनएशी मिळतेजुळते दिसत होते. मात्र, अधिक तपासानंतर जोसेफला अटक करण्यात आली.

उशिरा का होईना पण न्याय झाला अशी भावना पीडितांनी व्यक्त केली. १९७६ मध्ये झालेल्या बलात्कार पीडितेने अशा कृत्यासाठी कोणतीही माफी द्यायला नको असे म्हटले. या पीडितेचे वय त्यावेळी २९ वर्षे होते आणि तिला दोन अपत्ये होती. तर, ४४ वर्षांनी दोषीला शिक्षा झाली यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे एका पीडितेने म्हटले.

वाचा:

वय आणि आरोग्याच्या कारणास्तव शिक्षेतून वाचण्याचा प्रयत्न जोसेफने केला. मात्र, सरकारी वकीलांनी त्याला विरोध केला. एका पत्रकाराने जोसेफ तुरुंगात फिरत असल्याचा व्हिडिओ प्रकाशित केला. त्याचाच हवाला देत जोसेफ फिट असून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here