: पंजाबशी लागून असेलल्या पाकिस्ताना सीमेवर सुरक्षा दलाकडून पाच घुसखोरांना ठार करण्यात आलंय. तरन तारनच्या खेमकरन भागात सीमा सुरक्षा दलानं () ही मोठी कारवाई केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली. संपूर्ण भागात सुरू आहे.

बीएसएफच्या १०३ बटालियनच्या जवानांनी पहाटे ४.४५ वाजता ही कारवाई फत्ते केली. भारत – पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकी भागात काही संदिग्ध हालचाली या जवानांच्या लक्षात आल्या. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. घुसखोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत.

वाचा :

वाचा :

उल्लेखनीय म्हणजे, खेमकरन हा सीमेनजिकचा भाग आहे. ठार करण्यात आलेल्या घुसखोरांकडे असॉल्ट रायफल सापडल्याचंही म्हटलं जातंय. सीमेपलिकडून दहशतवाद्यांना भारतात धाडण्याचं काम केलं जातं. गेल्या काही काळात जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं दहशतवादी घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडलेत.

तसंच पंजाबमध्ये सीमेपलिकडून नशेचा धंदाही पसरवण्याचं काम केलं जातं. नशेची साधनं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातून येतात. राज्य सरकारकडून हे रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत परंतु, तरीदेखील अद्याप या प्रयत्नांना पुरेसं यश येऊ शकलेलं नाही.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here