कोल्हापूर: या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान -२०२० मध्ये , मुरगूड व गडहिंग्लज ही शहरे पहिल्या वीस क्रमांकामध्ये आली आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच स्वच्छ सर्वेक्षण -२०२१ अभियानात कागल, मुरगूड व गडहिंग्लज ही शहरे देशात पहिल्या तीन पारितोषिक विजेत्यामध्ये असतील, असा विश्वास व आशावाद ग्रामविकास मंत्री यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय पातळीवरील या यशाबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड व गडहिग्लजचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर या अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल, गडहिग्लज व उत्तूर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या या तीन नगरपालिकाना राजकीय अभिनिवेश न बाळगता विकासकामांसाठी भरपूर निधी दिला. पारितोषिक म्हणून कागल नगरपालिकेला दहा कोटी रुपये तर मुरगूड व गडहिंग्लज नगरपालिकाना प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून या तिन्ही शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणू.

यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी योगदानाबद्दल कागल, मुरगूड व गडहिंग्लज या तिन्ही शहराच्या जनतेचे, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here