वृत्तसंस्था, हैदराबाद : आणि यांच्या सीमेवर असलेल्या श्रीशैलम येथील भूमिगत जलविद्युत प्रकल्पात गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये एका महिलेसह नऊ इंजिनीअरचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकल्पस्थळी प्रचंड धूर पसरल्यामुळे बचावकार्यासाठी तब्बल १२ तास यंत्रणांना झुंजावे लागले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एका डेप्युटी इंजिनीअरचा, तसेच चार असिस्टंट इंजिनीअरचा समावेश होता. आत अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये आतल्या भागातील आगीचे व्हिडीओ काढून यंत्रणांना पाठवले आणि त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. या कर्मचाऱ्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत हा प्रकल्प वाचवण्याचा प्रयत्न केला, या शब्दांत ऊर्जामंत्री रेड्डी यांनी कर्मचाऱ्यांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले ३५ वर्षीय सुंदर नायक यांनी नुकताच करोनाला यशस्वी लढा देऊन त्यावर मात केली होती. गुरुवारी रात्री सूर्यापेट जिल्ह्यातील आपल्या गावातून ते ड्युटीवर हजर झाले होते. मात्र आगीनंतर जलविद्युत प्रकल्पाला लागलेल्या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

संबंधित बातमी :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here