मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचा तपास सीबीआयचे अधिकारी करत असून त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यासंदर्भात एक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला होता. यानं रिया देखील कूपर रुग्णालयात पोहोचली होती. तब्बल ४५ मिनिटं शवगृहातच होती, अशी माहिती आल्यानं नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.

रियाला शवगृहात येण्याची परवानगी मिळालीच कशी? इतका वेळ ती शवगृहात काय करत होती?, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. रिया शवगृहात असताना तिनं काय केलं याची माहिती रुग्णालयातील कर्मचारी सुरजीत सिंह राठोड यानं ‘एबीपी न्युज’ला दिली आहे.

सुशांतसिंह प्रकरणाशी संबंधित तीन महत्त्वाचे व्हिडिओ समोर आले आहेत. हे व्हिडिओ खटल्याच्या चौकशीत महत्त्वपूर्ण ठरू शकतात. यातील एक व्हिडिओ कूपर रुग्णालयातील आहे. व्हिडिओमध्ये सुशांतची
हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. सुशांतचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ती शवगृहात गेली होती. रिया रुग्णालयातील शवगृहात गेल्यानंतर सुशांतला पाहिल्यानंतर तिला अश्रु अनावर झाल्याचं कर्मचारी सुरजीत सिंहनं सांगितलं आहे. ती खूप रडू लागली. इतकंच नाही तर रियानं ‘सॉरी बाबू’ असं म्हणत सुशांतची माफी मागितली होती, असं आता समोर आलं आहे.

सीबीआयच्या टीमने गाठली मुंबई
दरम्यान, सुशांत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयची १५ सदस्यांची एक टीम मुंबईत पोहोचली आहे. सध्या त्यांचा मुक्काम संरक्षण मंत्रालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आला आहे. हे गेस्ट हाउस मानतळाजवळ आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारचा गोंधळ टाळण्यासाठी असे केल्याचे सांगण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here