नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या प्रकरणात चंदा कोचर यांनी बँकेच्या पैशाचा गैरवापर करून स्वत:चा फायदा करून घेतल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचरने आपल्या खासगी कामासाठी बँकेच्या पैशांचा दुरुपयोग केला. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, चंदा कोचर यांनी ६४ कोटी रुपयांची लाच घेतली होती. तसेच व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांना कर्ज देण्याबाबत अनियमितता आणि फसवणूक केली होती. सीबीआयने या प्रकरणी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्याची विनंती न्यायालयाला केली.

….तर बॅंकेचे नुकसान होईल; चंदा यांचे अपील फेटाळताना न्यायालयाचे निरीक्षण
केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने आपल्या आरोपत्रात म्हटले की, चंदा कोचर यांनी कर्जासाठी आवश्यक नियम अटींना पात्र नसलेल्या व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांना कर्ज दिले. याबदल्यात त्यांनी ६४ कोटींची लाच घेतली. तसेच व्हिडिओकॉनच्या मालकीच्या मुंबई येथील चर्चगेटस्थित फ्लॅट त्यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आला. २६ ऑगस्ट २००९ रोजी चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील ICICI बँकेच्या संचालकांच्या समितीने व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला कर्ज मंजूर केले. ७ सप्टेंबर रोजी कर्ज वाटप करण्यात आले.

कोचर, धूत यांच्याविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र; ३,२५० कोटींच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी कारवाई
सीबीआयकडून आरोपपत्र दाखल
सीबीआयने म्हटले की, कोचर यांना २०१६ मध्ये सीसीआय चेंबर्समध्ये फक्त ११ लाखाला फ्लॅट मिळाला. तर त्याच इमारतीत त्याच मजल्यावर त्यांच्या मुलाने २०२१ मध्ये १९.११ कोटींचा फ्लॅट खरेदी केला. चंदा कोचर त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक व्हीएन धूत यांच्यावर ३२५० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सीबीआयने या प्रकरणातील ११,००० पानांचे आरोपपत्र मार्चच्या अखेरीस दाखल केले होते, ज्यामध्ये तिघांची नावे होती.

चंदा आणि दीपक कोचर यांनी नेमक केलं तरी काय? ३ हजार २५० कोटींचा घोटाळा आहे तरी काय
सीबीआयने धूत यांचा पुतण्या, व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (VIEL) चे माजी संचालक सौरभ धूत आणि कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रय कदम यांनाही आरोपीच्या पिंजऱ्य़ात उभे केले आहे. या प्रकरणी सीबीआयने कोचरांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अटक केली होती. त्यानंतर या दाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here