मुंबई: पाणलोट क्षेत्रात मध्यम पाऊस पडत असल्याने जुलैमध्ये मुंबईकरांना १०% पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे, असं बीएमसीचे प्रमुख आय एस चहल यांनी मंगळवारी सांगितलं. हायड्रोलिक विभागाने प्रस्तावित केलेल्या १०% पाणीकपातीला मान्यता दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार, सिडको बुधवारपासून (५ जुलै) पुरवठा क्षेत्रात १५ टक्के कपात करणार आहे. तर, मुंबईत शनिवारपासून (१ जुलै) १०% पाणीकपात केली जाणार आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये राखीव साठा वगळून वर्षभरासाठी आवश्यक असलेल्या १४ लाख दशलक्ष लिटर साठ्यापैकी ६.९७% साठा होता. मुंबईत मंगळवारी हलका पाऊस झाला. बुधवारसाठी, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देणारा येलो इशारा जारी करण्यात आला आहे.

Weather Forecast: मुंबई-पुण्यासह ‘या’ भागांत अतिमुसळधार पाऊस, ८ विभागांना ऑरेंज अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट
तर, ठाणे आणि नवी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. मंगळवारी ऑरेंज अलर्ट दरम्यान, IMD च्या कुलाबा हवामान केंद्रात संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ११ मिमी तर IMD सांताक्रूझ वेधशाळेने ३१ मिमी पावसाची नोंद केली आहे. याच कालावधीत नवी मुंबईत ५८ मिमी आणि ठाण्यात ७०.४ मिमी पाऊस झाला.
Pune Murder: दर्शनाची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी काय-काय केलं, राहुलचा प्लान ऐकून पोलिसही चक्रावले
दोन आठवड्यांच्या विलंबानंतर रविवारी मुंबईत मान्सून बरसला. तेव्हापासून शहरात ३४४ मिमी पाऊस झाला असून जून महिन्यातील पावसाची तूट २५% इतकी आहे. जून महिन्यात सरासरी ५२६.३ मिमी पावसाची गरज आहे.

पाणीदार कोल्हापुरात भीषण पाणी टंचाई; लहान लेकरांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांची वणवण, टँकरसाठी रांगा

IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, उर्वरित आठवड्यात पाऊस सुरू राहण्यासाठी सिनोप्टिक परिस्थिती अजूनही अनुकूल आहे. “उत्तर छत्तीसगड आणि आजूबाजूला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तीन दिवसांत ते पश्चिम वायव्येकडून वायव्य मध्य प्रदेशाकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. समुद्र पातळीवर एक ऑफ-शोअर ट्रफ देखील आहे, जो दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यापासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत जातो आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर आणि त्याच्या शेजारच्या मध्य ट्रोपोस्फेरिक पातळीमध्ये चक्रीवादळ आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here