सीबीआयचे अधिकारी सुशांतचा मित्र आणि मॅनेजर सिद्धार्थ पिठानी आणि स्वयंपाकी निरज यांना घेऊन आज सुशांतच्या घरी पोहोचले आहेत. याच घरात सुशांतसिंहचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या भेटीत या प्रकरणातील काही धागेदोरे सापडतात का यासाठी सीबीआय कसून तपासणी करेल यात शंका नाही.
सर्वोच्च न्यायालयानं सुशांतआत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवला आहे. त्यामुळं सीबीआयच्या टीमनंही तपास कामाला सुरुवात केली आहे. या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयला प्रथम सुशांतसिंह राजपूत याचा खून झाला का हे शोधावं लागेल. हत्येशी संबंधित काही तथ्ये आढळतात का याचा तपास करताना सीबीआय घटनास्थळाची कसून तपासणी करणार आहे. त्याच प्रमाणं गुन्ह्याचा तपास, शवविच्छेदनाचा अहवाल आणि फॉरेन्सिक तपास केला जाईल. या सोबतच सीबीआयला मुंबई पोलिसांकडूनही काही तपशील मिळवावा लागणार आहे. त्याच प्रमाणं सीबीआय टीमला फॉरेन्सिक आणि टीएफसीची मदत घ्यावी लागेल. तसंच सुशांतच्या घरी पुन्हा तो क्राइम सीन क्रिएट करण्यात येणार आहे.
सीबीआयला मिळाले सुशांतच्या अपार्टमेन्टचे सीसीटीव्ही फुटेज
दरम्यान, सुशांतच्या अपार्टमेन्टचे सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयला मिळालं आहेत. हे फुटेज आता फॉरेन्सिक टीमला पाठवले जातील आणि नंतर त्याचा योग्य तो तपास केला जाईल. तसेच या फुटेजशी कोणी छेडछाड केली आहे का याचाही शोध घेण्याचा फॉरेन्सिक टीम प्रयत्न करणार आहे. सुशांतच्या घरी एक युवा नेता गेला होता म्हणून आदल्या रात्रीच त्याच्या घराचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते असं म्हटलं जातं होतं. त्यामुळे सीबीआयला हे फुटेज मिळणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I like the valuable information you provide in your articles.
A big thank you for your article.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.