लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका तरुणानं गळफास घेऊन केली. सोमवारी त्याचा मृतदेह घरात घरात सापडला. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांना खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात तरुणानं पत्नीचा उल्लेख आहे. माझ्या मृत्यूला पत्नी जबाबदार आहे. माझ्या मृतदेहाला वडील आणि मित्रांशिवाय कोणीही हात लावू नये असं त्यानं चिठ्ठीत लिहिलं आहे.बरेलीच्या बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संजय नगरमध्ये वास्तव्यास असलेला विनय उर्फ विक्की ई रिक्षा चालवून उदरनिर्वाह करायचा. रविवारी रात्री त्यानं पत्नीच्या ओढणीनं गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांना त्याच्या खोलीत एक सुसाईड नोट आढळून आली. त्यानं पत्नीला स्वत:च्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. पत्नी सतत वाद घालत असते. लग्नाला १० वर्षे झाली. या कालावधीत ती अनेकदा भांडून माहेरी गेली आहे, असा उल्लेख त्यानं नोटमध्ये केला आहे. विनयनं दहा वर्षांपूर्वी त्याच्या शेजारीच राहणाऱ्या तरुणीशी प्रेम विवाह केला होता. कोर्टात जाऊन त्यांनी लगीनगाठ बांधली होती. दोघांना आठ वर्षांचा एक मुलगा आहे. लग्नानंतर काही वर्षांतच पत्नी विनयकडे घटस्फोट मागू लागली होती, अशी माहिती विनयचा भाऊ कपिलनं दिली. पत्नी घटस्फोट मागत असल्यानं विनय तणावाखाली होता. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर विनयच्या पत्नीनं सासरच्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. यानंतर ती माहेरी राहू लागली. रविवारी विनय तिला घरी परत आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या मेहुण्यानं त्याला शिवीगाळ करुन हाकलून दिल्याचा आरोप आहे. माझी पत्नी आणि तिचे कुटुंबिय माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचं विनयनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ‘मी अनेकदा तिला बोलावलं. मात्र ती आली नाही. माझ्या लग्नाला १० वर्षे झाली. या १० वर्षांत पत्नी अनेकदा भांडून माहेरी गेली. तिला परत आणण्यासाठी गेलो तेव्हा मेहुण्यानं शिवीगाळ केली. माझ्या मृतदेहाला वडील आणि माझा मित्र पिंटू व्यतिरिक्त कोणीही हात लावू नये. माझ्या जिन्समध्ये पैसे आहेत. त्या पैशांनी अंत्यसंस्कार करण्यात यावे,’ असं विनय नोटमध्ये नमूद केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here