नवी दिल्ली : यंदाच्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी ७ दिवसांचा विलंब झाला. पण यानंतर अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. पण असं असलं तरी दक्षिण द्वीपकल्पात अद्यापही पाऊस पोहोचला नाही. नैऋत्य मान्सूनने देशाच्या बहुतांश भागांना झपाट्याने व्यापलं. बिपरजॉय या शक्तिशाली चक्रीवादळाचा प्रभाव संपताच, मान्सून गंगेच्या मैदानात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं.जूनच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे, देशातील एकूण पावसाची कमतरता १० दिवसांपूर्वीच्या -५१ टक्क्यांवरून दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) -१९ टक्क्यांवर आली आहे. परंतु ही आकडेवारी दिलासा देणारी नाही. कारण, बिहार, झारखंड आणि गंगेच्या पश्चिम बंगालसारख्या राज्यांचा समावेश असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात अजूनही पावसाची तूट कायम आहे. इथं शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीची तयारी करत आहेत. पण पावसाने बळीराजा चिंतेत आहे.

Maharashtra Monsoon : राज्यावर पावसाचं सावट, आज मुंबईला येलो तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

भारतातील ४७ % क्षेत्र पावसापासून वंचित…

देशभरातील एकूण ३६ उपविभागांपैकी २० उपविभागात अजूनही पावसाची कमतरता आहे. हा उपविभागीय प्रदेशात भारताच्या तब्बल ४७ टक्के भूभागाचा समावेश आहे. ज्यामध्ये बिहार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गंगा पश्चिम बंगाल, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. बिहारसारख्या महत्त्वाच्या तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये पावसाची तूट वाढून -७८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, तर पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये ती -५० टक्क्यांहून अधिक आहे.

जून महिना संपण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. अशात या सर्व चार राज्यांमध्ये गेल्या वर्षीही मान्सून सरासरीपेक्षा कमी होता. त्यामुळे सध्याची परिस्थिती चिंतेची आहे. सिंधू-गंगेच्या मैदानी भागासांठी चांगला मान्सून अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण, इथे लोक खरीप पिकांना सिंचन करण्यासाठी मोसमी पावसावर जास्त अवलंबून असतात. चार महिन्यांचा हंगाम (जून ते सप्टेंबर) देशातील वार्षिक पर्जन्यमानाच्या ७० टक्के पुरवण्यासाठी जबाबदार आहे, ज्याचा जीडीपी शेतीवर चालतो.

Solar Storm : २०२३ च्या शेवटी पृथ्वीवर मोठं संकट, शास्त्रज्ञही चिंतेत; दिला धोक्याचा इशारा

विनाशकारी पाऊस आणि ‘असामान्य’ मान्सून पॅटर्न

देशाचा एक भाग पावसाच्या प्रतीक्षेत असताना, दुसरा भाग मान्सूनच्या प्रकोपाचा सामना करत आहे. मान्सूनच्या तुफान पावसामुळे आसाममध्ये पूर आला आहे, हिमाचल प्रदेशात अचानक पूर आला आहे आणि भूस्खलन झाले आहे. तर उत्तर-पश्चिम भारतात अतिवृष्टी झाली आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वातावरण आणि समुद्राच्या सततच्या तापमानवाढीमुळे, असामान्य हवामानाच्या घटना तीव्र समोर येत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी, पुण्याच्या अशाच एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, १९५०-२०१५ दरम्यान अतिवृष्टीच्या घटनांमध्ये तिप्पट वाढ झाली. वाढत्या उष्णतेमुळे हवामानात बदल होत आहेत. साधारणपणे ११ जून रोजी मुंबईत दाखल होणारा मान्सून जवळपास दोन आठवड्यांनंतर किनारपट्टीच्या भागांत दाखल झाला आहे.

Pune Crime: रिलेशनमध्ये भांडणं, ब्रेकअपनंतरही सनकी तरूणाची एकच मागणी; सदाशिव पेठेतील घटनेचं धक्कादायक सत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here