नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. फेसबुक फ्रेंडने नौकरी देण्याचा बहाण्याने प्रथम महिलेला नागपुरात बोलावले. आणि आपल्या साथीदारासोबत महिलेला नागपूर ग्रामीण भागात नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आणि अधिक तपास सुरू आहे. पिंटू गजभिये आणि कार्तिक चौधरी अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. पीडित महिला ३२ वर्षांची असून ती मध्य प्रदेशची रहिवासी आहे. तिला दोन मुले आहेत. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती वेगळी राहते. तिची ओळख आरोपी पिंटू गजभिये याच्याशी ३ वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. आरोपी हा रमना मारोती परिसरात राहत असून तो चालक म्हणून काम करतो. पिंटूने या महिलेला नोकरी मिळऊन देण्याचा बहाण्याने भेटायला नागपुरात बोलावले होते.
हवालदाराने रागात विजेच्या डीपीत हात घातला, एकदा वाचला, उठून पुन्हा हात लावला अन् खेळ संपला
रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही महिला बसने मध्य प्रदेशातून बसस्थानकावर पोहोचली. तिथून आरोपीने तिला कारमध्ये बसवून नागपूर ग्रामीण येथील सावनेरमध्ये नेले. यादरम्यान पिंटू गजभिये आणि त्याचा सहआरोपी कार्तिक चौधरी यांनी महिलेवर बलात्कार केला. रात्रभर तिला गाडीत बसवल्यानंतर पुन्हा सीताबर्डी कॅम्पसमध्ये आणून सोडण्यात आले.
पावभाजीच्या गाडीवर भांडी धुतली, झोपडपट्टीतल्या मुलांसाठी बनला शिक्षक, नागपूरच्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी
पीडित महिलेने पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आरोपींनी महिलेला ज्या गाडीतून नेले होते, त्या गाडीच्या चालकाच्या भूमिकेचाही पोलीस तपास करत आहेत.

ग्रामीण पोलिसांच्या वायरलेस विभागात अधिकारी दारू पिऊन ड्युटीवर; पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here