नवी दिल्ली:
नीती आयोगाच्या गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीला अर्थमंत्री अनुपस्थित राहिल्या. त्यांच्या गैरहजेरीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर तिरकस शेरेबाजी करत टीका केली आहे. ‘एक सल्ला आहे, पुढच्या बजेट मीटिंगला अर्थमंत्र्यांना आमंत्रण देण्यावरही विचार व्हावा,’ असं ट्विट काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलं आहे. सोबत खोचकपणे ‘फाइंडिंग निर्मला’ असा हॅशटॅगही वापरला आहे.

अन्य एका ट्विटमध्ये मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने म्हटलंय, ‘एका महिलेला काम करण्यासाठी किती पुरुषांची आवश्यकता भासते.’ पंतप्रधान मोदींच्या या प्री-बजेट मीटिंगमध्ये निर्मला सीतारामन नसल्या तर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.

पुढच्या बैठकीला अर्थमंत्र्यांना निमंत्रण द्या हा सल्ला भाजपला देण्याचा बहाणाही काँग्रेसने शोधून काढला! भाजपने एक ट्विट केल होतं. त्यात अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पाशी संबंधित सूचना मागितल्या होत्या. २० जानेवारीपर्यंत या सूचना द्यावयाच्या आहेत. या ट्विटला रिट्विट करत काँग्रेसने अर्थमंत्रालयाशी संबंधित बैठकीत अर्थमंत्र्यांना बोलावण्याची सूचना देऊन टाकली!!

निर्मला सीतारामन यांच्या अनुपस्थितीबद्दल भाजपमधील सूत्रांनी सांगितले की त्याच वेळी भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांसोबत सीतारामन यांची बैठक होती. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी नीती आयोगाच्या बैठकीत तज्ज्ञांसोबत चर्चा करून आणि भारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यास सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here