पंढरपूरः वारकरी संप्रदायाने लॉकडाऊनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. करोना संक्रमणामुळं गेल्या साडे पाच महिन्यांपासून बंद असलेले भाविकांसाठी खुले करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेनं एक लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते करणार आहेत. वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे अस्तित्व न मानणारे आंबेडकरांकडे याचे नेतृत्व आल्याने आंदोलनाचे महत्व वाढले आहे. कायम हिंदुत्ववादी शिवसेना व भाजपच्या सोबत असलेला वारकरी वंचित कडे गेल्याने विचारांचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे.

लॉकडाउनमुळं विठ्ठल मंदिर ३१ ऑगस्ट पर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे २ लाख वारकरी येतील, अशा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी या प्रश्नावर जिल्हाधिकारी विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

सध्या पंढरपूर मध्ये २०३५ कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाल्याने २४ ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मात्र संघर्ष अटळ बनणार आहे. या विषयावर वाद पेटला असताना सर्वसामान्य वारकरी मात्र या वादापासून अलिप्तच आहेत.

वाचाः

वारकरी का झाले आक्रमक?

करोना संसर्गामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहेत. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी धार्मिक स्थळांना आणि सण-उत्सवांना तितकासा दिलासा मिळालेला नाही. यंदा आषाढी वारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली. आषाढी यात्रेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्याशिवाय राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. या सगळ्याच मुद्द्यांवरून वारकरी संप्रदाय नाराज असून या नाराजीचा आता स्फोट होण्याची भीती आहे. वारकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या लढ्याला अधिकच धार आली आहे. याबाबत आता सरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.

वाचाः

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

7 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here