नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत बराच काळ मैदानापासून दूर आहे. तो क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी खूप मेहनत घेतानाही दिसत आहे. पण आता ऋषभ पंत वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. यामुळे तो गंभीर जखमीही झाला. त्याला जबर दुखापत झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ५ जानेवारीला तो पूर्ण शुद्धीत आली. पण आता ऋषभ पंतने त्याची जन्मतारीख बदलून पुनर्जन्माची तारीख टाकली आहे.

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आता त्यांने सोशल मीडियाचे सर्वात लोकप्रिय व्यासपीठ ट्विटरवर ५ जानेवारीला आपला पुनर्जन्म झाल्याचे म्हटले आहे. पंतने त्याच्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये ५ जानेवारी २०२३ अशी त्याची दुसरी जन्मतारीख नमूद केली आहे. फक्त ट्विटर नव्हे तर त्याने इंस्टाग्राम काकूंच्या बायोमध्ये सुद्धा हा बदल केला आहे. म्हणजे ज्या दिवशी कार अपघातानंतर तो पुन्हा एकदा शुद्धीत आला. पंतचा अपघात खूप धोकादायक होता. तो मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे.

Rishabh Pant Twitter Account

Rishabh Pant Instagram Account

NCA मध्ये फिटनेसवर काम

अपघातानंतर पंतवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही काळ त्याला पायावर उभेही राहता आले नाही. पण आता पंत वेगाने बरा होत आहे. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. पंत आता जिममध्येही त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. लवकरच आपल्याला त्याच्या हातात बॅट किंवा विकेटकीपिंग ग्लोव्ह्ज पाहता येतील अशी आशा आहे.

गॉगल, चैन, ब्रेसलेट.. ऋषभ पंतचा स्वॅग

पंतची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२५ वर्षीय पंतने भारतासाठी आतापर्यंत ३३ कसोटी, ३० एकदिवसीय आणि ६६ टी-२० सामने खेळले आहेत. पंतने कसोटीत ४३.७ च्या सरासरीने २२७१ धावा, एकदिवसीय सामन्यात ३४.६ च्या सरासरीने ८६५ धावा आणि टी-२० मध्ये २२.४ च्या सरासरीने ९८७ धावा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here