नवी दिल्लीः चकमकीनंतर दिल्लीत पकडण्यात आलेला संशयित दहशतवादी अबू युसूफने चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. दिल्ली आणि यूपीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. तो अफगाणिस्तानातील त्याच्या मास्टर्सच्या संपर्कात होता. तिथून त्याला सूचना दिल्या जात होत्या. आत्मघातकी हल्ल्यासाठी शरीराव बांधण्याकरता त्याने स्फोटकांनी भरलेला बेल्टही बनवला होता. १५ ऑगस्टला दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तो हल्ला करणार होता. पण कडक सुरक्षेमुळे तो अपयशी ठरला, असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या डीएसपींनी ही माहिती दिली.

राम मंदिर बांधण्याविरोधात त्याला बॉम्बस्फोट करायचा होता. अफगाणिस्तानातल्या काही म्होरक्यांच्या तो संपर्क होता, अशी प्राथमिक माहिती संशयिताच्या चौकशीदरम्यान समोर आलीय. त्याच्याकडून जप्त केलेल्या प्रेशर कुकरमधील स्फोटकं आणि त्यात कोणते केमिकल वापरले गेले याचा एनएसजी टीम तपास करत आहे.

गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा यंत्रणांना काही दिवसांपूर्वीच अॅलर्ट जारी केला होता. राम मंदिर बांधण्याच्या मुद्द्यावर दहशतवादी मोठी घटना घडवू शकतात. त्यांच्या निशाण्यावर व्हीआयपी आणि राजधानी दिल्ली आहे, असं गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं होतं.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने धौलकुआ आणि करोल बाग दरम्यान रिज रोडवर काल रात्री झालेल्या चकमकीनंतर आर्मी पब्लिक स्कूल जवळ एका संशयित दहशतवाद्याला पकडलं. त्याच्याकडून दोन प्रेशर कुकरमधील १५ किलो आयईडी जप्त करण्यात आला होता. आयईडी आढळून आल्याच्या वृत्तानंतर प्रशासन हादरलं. स्पेशल सेल आणि बॉम्ब डिस्पोजल पथक आयईडीसह बौद्ध जयंती पार्क येथे पोहोचले आणि त्यांनी ते बॉम्ब डिफ्यूज केले.

या कारवाईसाठी एनएसजी कमांडोंनाही बोलवण्यात आलं होतं. अबू युसूफ याला संशयित दहशवादी म्हणून अटक करण्यात आली आहे. अबू युसूफ हा आयएसआयएलच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. अबू युसूफ हा यूपीमधील बलरामपूरचा रहिवासी आहे. त्याच्या निशाण्यावर मोठ्या व्यक्ती होत्या. त्याने राजधानी दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात रेकीही केली होती, अशी माहिती आहे.

राजधानी दिल्लीतील कोण कोणत्या भागाची त्याने रिके केली होती, हे चौकशीतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणता मोठा चेहरा या दहशतवाद्याचा निशाण्यावर होता. कोण इसिसच्या दहशतवाद्याला मदत करत होतं. या संदर्भात संशयित दहशतवाद्याची सतत चौकशी केली जात आहे. इसिसने वुल्फ अटॅकचा कट रचला होता, असं सांगितलं जातं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here