मुंबई: भारतात क्रिकेट म्हणजे धर्म आहे. चाहते त्यांच्या लाडक्या खेळाडूंना देव मानतात. आवडत्या खेळाडूंसोबत चाहत्यांसोबत खेळाडूंच्या भावना जोडलेल्या असतात. लाडक्या खेळाडूला डावलण्यात आल्यानंतर, त्याला संधी मिळत नसल्यावर चाहते संघ व्यवस्थापन, निवड समितीला लक्ष्य करतात. निवड समिती, संघ व्यवस्थापनानं आवडत्या खेळाडूला संधी न दिल्यास चाहत्यांना वाईट वाटतं. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर समोर आला आहे. शानदार कामगिरी करत असतानाही एका खेळाडूला संघाबाहेर ठेवण्यात आलं. त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यानं क्रिकेट पाहणंच सोडून दिलं. या क्रिकेटपटूचं नाव . शानदार फलंदाजीसोबत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी कैफ ओळखला गेला. २८ जूनला त्यानं एक ट्विट केलं. २०२३ च्या विश्वचषकात भारताला पाठिंबा द्यायला हवं, असं कैफनं त्याच्या चाहत्याला सांगितलं.कैफचा फॅन नेमकं काय म्हणाला?कैफचा चाहता असलेल्या आसिफ रझानं कैफला टॅग करत एक ट्विट केलं. ‘इंग्लंडविरुद्ध नागपूर कसोटीत सर्वाधिक ९१ धावा करुनही तुम्हाला पुढच्या सामन्यात संधी दिली गेली नाही. त्या सामन्यापासून मी क्रिकेट बघणं बंद केलंय,’ असं रझानं ट्विटमध्ये म्हटलं.चाहत्याला कैफनं काय सांगितलं?‘जुन्या गोष्टी सोडून दे आरिफ. क्रिकेट क्रिकेटपटूंपेक्षा मोठं आहे. चाहत्यांशिवाय खेळ काहीच नाही. विश्वचषक स्पर्धा भारतात होतेय. टीम इंडियाला पाठिंबा द्या, खेळावर पुन्हा प्रेम करा,’ अशा शब्दांत कैफनं त्याच्या चाहत्याला जुन्या गोष्टी विसरण्याचं आवाहन केलं. चाहत्याला नेमकं काय खुपलं?कैफचा चाहता आसिफ रझानं ट्विटमध्ये नागपूर कसोटीचा उल्लेख केला आहे. २००६ मध्ये भारत वि. इंग्लंड सामना नागपूरमध्ये रंगला. त्या कसोटीच्या पहिल्या डाव्यात कैफनं ९१ धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला. यानंतर मालिकेत आणखी दोन कसोटी सामने होते. मात्र त्या दोन्ही सामन्यांत कैफला संधी मिळाली नाही. इंग्लंडच्या या दौऱ्यानंतर राहुल द्रविडकडे संघाचं नेतृत्त्व देण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here