मुंबई : विना परवाना आणि बिगर आवश्यक गोष्टींसाठी बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा सपाटाच मुंबई पोलिसांनी लावला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या चार दिवसात २००० वाहने जप्त केली आहेत. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नुकताच मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे दिला होता. एकीकडे आपण फक्त राज्य सरकारच्या आदेशाचं पालन करत असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे, तर राज्यात नेमकं लॉक आहे की आपण अनलॉकिंगकडे वाटचाल करतोय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

‘तुम्ही कृपया विना परवाना आणि विना आवश्यक वाहतूक काय आहे हे स्पष्ट करू शकता का? पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी पाहतोय. आश्चर्य वाटतंय की तुम्ही फक्त परवाना असलेल्या आणि अत्यावश्यक वाहनांनाच परवानगी दिलीय,’ असं खोचक ट्वीट कार्यकर्ते संदीप ओहरी यांनी मुंबई पोलिसांना रिप्लाय देताना केलं.

शॉपिंग आणि व्यायामासाठी बाहेर जाणे अशा गोष्टींसाठी जास्त लांब जाऊ नये, असे सरकारचे नियम आहेत. म्हणजेच कुणी वरळीत राहत असेल तर त्या व्यक्तीने मुलुंडच्या मॉलमध्ये जाऊ नये. कारण, त्याला जवळच्या मॉलमध्ये जाणंच योग्य आहे. करोनाविरोधात लढायचं असेल तर सर्वांनी मिळून काळजी घेणं अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया एका आयपीएस अधिकाऱ्याने दिली. वैद्यकीय गरजा आणि परवानगी दिलेल्या सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच निर्बंधरहित वाहतूक करता येईल.

‘आमच्याकडे काही ठिकाणी नियमीत नाकाबंदी आहे, जिथे वाहनांची तपासणी केली जाते. पण परवानगी नसलेल्या गोष्टींसाठी नागरिक बाहेर पडत असल्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आमच्याकडे नाकाबंदी वाढवण्याशिवाय पर्याय नाही’, असं या अधिकाऱ्याने सांगितलं. परवानगी दिलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त लोक प्रवास करत असल्याने पोलिसांनी नाकाबंदी वाढवली आहे. तीन चाकी वाहनांमध्ये फक्त दोन जण आणि चालक, चार चाकीमध्ये ३ अधिक १ अशी परवानगी आहे. पण ही मर्यादा पाळली जात नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मंगळवारी २५० पेक्षा जास्त, बुधवारी ५९२, गुरुवारी ६३३ आणि शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५५० वाहने जप्त करण्यात आली होती. जास्त वाहने ही पश्चिम उपनगरात जप्त करण्यात आली.

घरापासून २ किमीपेक्षा जास्त अंतर ओलांडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू केल्यामुळे जून महिन्यात पोलिसांवर टीका झाली होती. कार्यालयात जाणाऱ्या व्यक्तींना यातून सूट मिळाली होती. एक आठवड्यातच पोलिसांनी २ किमी या ऐवजी जवळचं क्षेत्र असा बदल केला. ट्विटरवर पोलिसांना या कारवाईमुळे अजूनही टीकेचा सामना करावा लागत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here