म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः जिल्ह्यातील मनगुत्ती या गावात रविवार सायंकाळपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्यास मंगळवारी महाराष्ट्रातील कवळी कट्टी ते मनगुत्ती पर्यंत दांडी मार्च काढण्याचा इशारा कोल्हापुरातील शिवसेनेने दिला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणी शिवसेना पुन्हा आक्रमक झाल्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे. (
Protest Against
)

मनगुत्ती या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, पण पंधरा दिवसांपूर्वी अचानक सरकारने हा पुतळा रातोरात तेथून हटवला. त्यानंतर सीमाभागातील मराठी बांधव व शिवसेना आक्रमक झाली. महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पत्र देऊन तातडीने होता त्या ठिकाणी पुतळा बसवण्याची मागणी केली.

याची दखल घेत बेळगाव जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांची बैठक झाली. या बैठकीला प्रमुख ग्रामस्थही उपस्थित होते. या गावात शिवाजी महाराजांच्यासह पाच व्यक्तींचे पुतळे तातडीने बसवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. आश्वासन देऊन पंधरा दिवस पूर्ण झाले तरी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे.

उद्या रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ पर्यंत जर होता त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नाही तर मंगळवारी मनगुत्ती गावात घुसण्याचा इशारा शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन राज्यातील वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या आंदोलनाला विरुद्ध शिवसेना असे राजकीय स्वरूप आलेले आहे.

वाचाः

कर्नाटकात भाजपची सत्ता असून सत्ताधाऱ्यांनी हा पुतळा रातोरात हटवून वादाला फोडणी दिली होती. गावातील दोन गटाच्या वादात ही कार्यवाही केल्याचे सांगत सरकारने हात वर करण्याचा प्रयत्न केला होता, पण सरकारच्या इशाऱ्यानुसार पोलिसांनी पुतळा हटवला होता. यावरून सरकारच्या मनातच शिवाजी महाराजांच्या विषयी द्वेष भावना असल्याचा आरोप तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here