पिंपरी : मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कायदा सुव्यस्था बिघडल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच सहकारनगर परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. मात्र आता पुणे शहराबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील गाड्या फोडीचे सत्र सुरू झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली घरकुल परिसरात दोन व्यक्तींनी दारूच्या नशेत चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने चिखली घरकुल परिसरात खळबळ उडाली असून गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली घरकुल आणि शरद नगर परिसरात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दोन व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आल्या. त्यांनी हातात कोयते घेऊन येथील चारचाकींसह आठ ते दहा वाहनांची नाहक तोडफोड केली. वाहने फोडल्यानंतर त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनेची दखल घेत या दोघांना अटक केली आहे.

सुदैवाने जीव वाचला, नाहीतर आज माझी मुलगी दिसली नसती; पीडित तरुणीच्या आईने सांगितली हकिगत

भरदिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत वाहनांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही सर्व घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Pune Crime : सदाशिव पेठेतील घटनेतून धडा, आता गुन्हेगारांची खैर नाही; पुण्यात पोलिसांचा मोठा निर्णय
पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील कोयता गँग सक्रिय झाल्याचे आता पाहायला मिळत आहे. पुणे शहरात सलग दोन ते तीन दिवस वाहने फोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये देखील नागरिकांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकार घडल्याने कोयता गँग आता पुन्हा सक्रिय होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Pune Sadashiv Peth Attack: पुण्यातील सदाशिव पेठ हल्ला प्रकरणात नवी माहिती उघड; आरोपीने पोलिस जबाबात सांगितलं खरं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here