नवी मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर दोन बसची धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. राज्य सरकारची एसटी आणि जेएसडब्ल्यू बस एकमेकांवर आदळल्याने प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले. एसटी आणि बस एकमेकांवर आढळल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ओव्हटेक करताना भरधाव बोलेरो पलटी, पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना अनर्थ; एकाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावर दोन बसची धडक झाल्याचा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात पळस्पे फाट्याजवळील साईकृपा हॉटेलसमोरील घडला आहे. राज्य सरकारची एसटी आणि जेएसडब्ल्यू कंपनीची बस एकमेकांवर आदळल्याने प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत ३ जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अनेकजण किरकोळ जखमी झाले असून सर्वांना पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत

भयानक अपघात! ट्रकच्या धडकेत एसटीच्या समोरील भागाचा चुराडा

या अपघातामध्ये राज्य सरकारची असलेल्या एसटीवरील चालकाचे नाव संतोष म्हात्रे आहे. तर संजय म्हात्रे जे एस डब्ल्यू बसवरील चालक आहेत. या अपघातामध्ये १ महिला गंभीर जखमी झालेली आहे. तसेच इतर जखमी रुग्णांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर नेहमीच अपघातांचे सत्र सुरू असते. ह्या अपघातांमध्ये अनेकांना जीव देखील गमवावे लागतात. मुंबई गोवा मार्गावर झालेला अपघात हा देखील भीषण अपघात झाला असून यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. दुर्दैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून पनवेल पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here