बीजिंग: भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीक आणखीच वाढत आहे. पाकिस्तान हा चीनच्या बेल्ट अॅण्ड इनिशिएटिव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील महत्त्वाचा देश आहे. चीनकडून पाकिस्तानमध्ये पायाभूत प्रकल्प सुरू असताना लष्करी पातळीवरही करार करण्यात आले आहेत. चीनने आता पाकिस्तानसाठी खास युद्धनौका तयार केली असल्याचे समोर आले आहे. ही युद्ध नौका खास असून रडारवरही दिसत नाही.

चीनच्या हुडॉन्ग-झॉन्गहुआ शिपयार्डमध्ये पाकिस्तानसाठीच्या टाइप-०५४एपी श्रेणीतील मल्टिपर्पज स्टेल्थ फ्रीगेट ही युद्धनौका तयार करण्यात आली आहे. ही युद्ध नौका रडारलाही गुंगारा देऊ शकते. पाकिस्तान नौदलाकडे सध्या नऊ फ्रिगेट्स, पाच पाणबुडी, १० मिसाइल बोट आणि तीन माइनस्वीपर आहे. चीनकडून मिळणार असलेल्या या युद्धनौकेमुळे पाकिस्तानच्या नौदलाची क्षमता अधिक वाढणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलासमोर आणखी आव्हान निर्माण होणार आहे. ही युद्धनौका ४००० समुद्र मैल अंतरावर हल्ला करण्यास सक्षम आहे. त्याशिवाय जमिनीवरून हवेत क्षेपणास्त्र डागता येऊ शकतात. त्याशिवाय पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र या युद्धनौकेत असणार. पाकिस्तानला हे शस्त्र २०२१-२३ दरम्यान मिळणार आहे.

वाचा:

पाकिस्तान नौदलाला चिनी युआन वर्गातील पाणबुडी मिळणार आहे. ही पाणबुडी जगातील शांत समजल्या जाणाऱ्या पाणबुडीपैकी एक आहे. यातील आठ पैकी चार पाणबुडी २०२३ मध्ये पाकिस्तानला मिळणार आहे. डिझेल इलेक्ट्रीक असलेल्या चिनी पाणबुडीमध्ये अॅण्टी शिप क्रूझ मिसाइल आहे. ही पाणबुडी एअर इंडिपेंडेट प्रपल्शन सिस्टममुळे कमी आवाज निर्माण करते. त्यामुळे पाण्याखाली असताना ही पाणबुडी शोधणे कठीण असते.

वाचा:

त्याशिवाय पाकिस्तान नौदलाला आणखीही शस्त्रे देणाप आहे. यासाठी पाकिस्तान व चीनमध्ये सात अब्ज डॉलरचा करार झाला आहे. पाकिस्तान चीनकडून जवळपास ७० टक्के शस्त्रे खरेदी करतो. तर, चीनदेखील पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात आपला नाविक तळ उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here