डोंबिवलीत, ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील सांडपाणी नेहमीच चेम्बरमधून ओव्हरफ्लो होत रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत असतात. आज सकाळपासून पाऊस कोसळत असतानाच केमिकल मिश्रित सांडपाणी नाल्यातून बाहेर पडत पावसाच्या पाण्यात मिसळत आहे. यामुळे या भागात राहणारे आणि प्रवास करणारे नागरिक संतापले आहेत.

एमआयडीसीकडून कंपन्यातील सांडपाणी बंदिस्त नाल्याद्वारे प्रक्रिया केंद्रापर्यत वाहून नेत या पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर ते सांडपाणी पुन्हा बंदिस्त नाल्याद्वारे खोल खाडीत सोडण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र कंपन्यापासून सांडपाणी प्रकल्पापर्यंत हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात ठिकठिकाणी डेब्रिजच्या गोणी, प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली बारदाने, प्लास्टिकचा कचरा टाकला जात असल्याने हे नाले तुंबतात. या नाल्याची सफाई करण्याचे काम एमआयडीसीचे आहे. मात्र यंदा एमआयडीसीकडून ही नालेसफाई झाल्याचे दिसत नाही. यामुळेच टाटा पॉवरकडून खंबाळपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर या नाल्यातील सांडपाणी चेम्बर्समधून रस्त्यावरून वाहत आहे.

मुसळधार पावसात स्कूटी लावली, घरी चालत निघाला, पण पोहोचलाच नाही; वसीमसोबत काय घडलं?
लाल रंगाच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे एमआयडीसी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वी डोंबिवलीत झालेला हिरवा पाउस, गुलाबी रस्ता, हिरवा नाला यामुळे डोंबिवली शहराला प्रदुषणाचा विळखा असल्याचे उघड झाले आहे. आता हे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने शहराची प्रदुषणातून मुक्तता करण्यासाठी संबधित यंत्रणांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Crime News: अंगठीवरुन टिटवाळ्यातील टीसीच्या मृतदेहाची ओळख पटली, हत्येसाठी विषारी सापाचा वापर, पोलिसही चक्रावले
मलनिस्सारण केंद्राचे सांडपाणी रस्त्यावर

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अंबरनाथ – बदलापूर महामार्गावर पालिकेच्या भुयारी गटाराच्या झाकणातून थेट मलनिस्सारण बाहेर पडू लागले आहे. त्यामुळे यास रस्त्यावर सर्वत्रच सांडपाणी आणि दुर्गंधी पसरली होती.

खड्ड्यांमुळे नाकी नऊ; शहापूरमध्ये शाळा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांचा चक्क जेसीबीतून प्रवास

अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे संथ गतीने वाहतूक सुरू होती. वडवली नाक्यावर भुयारी गटाच्या लाइनमधून थेट सांडपाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडत असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. नेमकं हे सांडपाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं आलं? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

1 COMMENT

  1. Hey there! I’ve been following your website for some time now and finally got the bravery to go ahead and give you a shout out from Austin Texas!
    Just wanted to mention keep up the fantastic work!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here