नवी मुंबई : नेरूळ येथील कॉस्मोपॉलिटन-२ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चक्क स्ट्रक्चरल ऑडिट अहवालातून २७ रो हाऊसेस आणि २० दुकाने वगळल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. परिणामी, वास्तव्यास अतिशय धोकादायक म्हणून महापालिकेनेच जाहीर केलेल्या या सोसायटी इमारतीचा पुनर्विकास रखडल्याची रहिवाशांची तक्रार आहे.

एकीकडे महापालिकेने येथील इमारतीत राहणाऱ्या १०९ कुटुंबांना इमारत तातडीने रिकामी करण्यासाठी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर फलक लावला आहे. तर, दुसरीकडे आर्थिक लाभासाठी या इमारतीचा पुनर्विकास रखडवण्याचे कंत्राट पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातील अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप केला जात आहे. या अनधिकृत बांधकामाला अभय देणाऱ्या अतिक्रमणविरोधी विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तसेच, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसह सोसायटीतील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

Mumbai News: रस्त्यावरील अडथळे दूर, मेट्रो मार्गिकांजवळील मार्ग प्रशस्त; कारण एमएमआरडीएने आता…
सिडकोने नेरूळ, सेक्टर १७ येथील १८२ क्रमांकाचा भूखंड निवासी व व्यावसायिक वापरासाठी भाडेकरारावर कॉस्मोपॉलिटन २, पुनीत पार्क यांना दिला आहे. या भूखंडावर तळमजला अधिक सात मजल्यांची इमारत असून यात ए, बी, सी आणि डी अशा चार विंग आहेत. याशिवाय या भूखंडावर २७ रो हाऊसेस व २० दुकाने उभारण्यात आली आहेत. संपूर्ण भूखंडावर निर्माण करण्यात आलेल्या इमारती, रो हाऊसेस आणि दुकाने यांची कॉस्मोपॉलिटन -२ को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या नावाने ही संस्था निबंधक सहकारी संस्था, सिडको यांच्याकडे सन १९९९मध्ये नोंदणीकृत आहे.

कॉस्मोपॉलिटन हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील २७ रो हाऊसेसमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी अतिक्रमण केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्याबाबत अनेकवेळा संस्थेने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडे लेखी तक्रारी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अतिक्रमणविरोधी विभागाचे तत्कालीन उपायुक्त, कनिष्ठ अभियंता आणि संस्थेच्या आवारात अतिक्रमण करणारे रो हाऊस मालक यांच्यात असलेले आर्थिक संबंध यामुळेच संस्थेच्या आवारातील अतिक्रमण हटविण्याऐवजी ते अधिकृत करण्यासाठी महापालिका अधिकारी गेले काही वर्षे प्रयत्न करत असल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच सोसायटीतील अनधिकृत बांधकामाबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता असे कुठलेही तक्रार अर्ज महापालिकेच्या अभिलेखात उपलब्ध नाहीत, असे नेरूळ ब विभागातर्फे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे, असा आरोपही रहिवाशांनी केला आहे.

निर्णय घेण्यासाठी नऊ महिने

या संस्थेच्या आवारातील संपूर्ण बांधकामे धोकादायक असल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून महापालिकेकडे अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर निर्णय घेण्यासाठी अतिक्रमणविरोधी विभागाने तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी घेतला. संस्थेने सादर केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालावर निर्णय देताना कॉस्मोपॉलिटन सोसायटीतील २७ रो हाऊसेस आणि २० दुकाने वगळून उर्वरित चार विंग असलेली ७ मजली इमारती सी -१ प्रवर्गात (म्हणजेच राहण्यास अति धोकादायक, अयोग्य आणि तत्काळ निष्कासित करणे ) मोडत असल्याने महापालिकेने धोकादायक इमारतींच्या यादीत या सोसायटीचे नाव नुकतेच प्रसिद्ध केले आहे. तसेच, याबाबतची नोटीस महापालिकेने २३ जून रोजी सोसायटीच्या प्रवेशद्वारावरही लावली आहे.

रस्त्यावर काचेच्या तुकड्यांचा खच, बाटल्या अन् दगड; भुजबळांनी सांगितली बंडानंतर मुंबईत परतल्यानंतरची परिस्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here