सुशांतच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिलेनं १३ जूनच्या रात्री सुशांतच्या घरातील लाइट १०.३० ते ११.०० च्या दरम्यान बंद झाल्या होत्या. सहसा असं होतं नाही कारण ते रात्री उशीरापर्यंत जागे असतात. मात्र, त्यादिवशी किचनची लाइटसोडून बाकी सर्व लाइट्स बंद होत्या, असा महत्त्वाचा खुलासा त्यांनी केला आहे.
१३ जूनच्या रात्री नव्हती झाली पार्टी
सुशांतच्या घरी १३ जूनच्या रात्री पार्टी झाल्याचा आरोप करण्यात येत होता. या पार्टीला एका युवा मंत्रीही सहभागी झाला होता. असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र, या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री कोणतीही पार्टी झाली नसल्याचा दावा केला आहे. मात्र, त्या दिवशी लाइट लवकर का बंद झाल्या ही संशयास्पद गोष्ट असल्याचंही तिनं नमूद केलं.
शेजाऱ्यांनी केलेल्या दाव्यामुळं नवा ट्विस्ट
शेजाऱ्यांनी केलेल्या या दाव्यामुळं सुशांतसिंह प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. सुशांतच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही त्या रात्री कोणतीही पार्टी झाली नाही, अशी माहिती दिली आहे. मात्र, नेहमी उशीरा पर्यंत जागणाऱ्या सुशांतच्या घरातील लाइट त्यारात्री लवकर बंद का झाल्या, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सीबीआयला मिळाले सुशांतच्या अपार्टमेन्टचे सीसीटीव्ही फुटेज
दरम्यान, सुशांतच्या अपार्टमेन्टचे सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयला मिळालं आहेत. हे फुटेज आता फॉरेन्सिक टीमला पाठवले जातील आणि नंतर त्याचा योग्य तो तपास केला जाईल. तसेच या फुटेजशी कोणी छेडछाड केली आहे का याचाही शोध घेण्याचा फॉरेन्सिक टीम प्रयत्न करणार आहे. सुशांतच्या घरी एक युवा नेता गेला होता म्हणून आदल्या रात्रीच त्याच्या घराचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते असं म्हटलं जातं होतं. त्यामुळे सीबीआयला हे फुटेज मिळणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times