कोल्हापूरः हे विघ्नहर्ता गणपती देवा! करोनाच्या जागतिक महामारीचे हे संकट लवकरात लवकर दूर कर, असे साकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री गणरायाला घातले. कागलच्या कोविड केअर सेंटरमध्ये दीड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती झाली. कोविड केअर सेंटरमध्ये गणपती प्रतिष्ठापना हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असण्याची शक्यता आहे.

करोनाच्या जागतिक महामारीचे सावट श्री गणरायाच्या या उत्सवावर सुद्धा आहेत. या महामारीमुळे जनता गणरायाच्या स्वागताबरोबरच उत्सव आणि विसर्जनही आनंदाने करू शकत नाही. त्यामुळे जनता दुःखी झाली आहे. गणपती हा विघ्नहर्ता म्हणून लौकिक आहे. गणपतीच्या आशीर्वादामुळे करोनाचे महाभयानक संकट लवकरच दूर होईल, अशी आशा मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी करोना संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला कागलच्या तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. डी. बी. शिंदे , जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता श्री. ए. जी. चांदणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे , कागलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी श्रेयस जुवेकर, आरटीओ चेकपोस्टचे व्यवस्थापक नीलेश भोसले आदी उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here