न्यूयॉर्क : बऱ्याचदा लोक कोट्याधीश किंवा लखपती होण्यासाठी संपूर्ण आयुष्य झटतात तर काही असेही असतात जे असं नशीब घेऊन जन्माला येतात की जन्माच्या फक्त काही दिवसांनीच कोट्याधीश बनतात. पण अमेरिकेत एक घटना समोर आली आहे एका मुलीचं जन्माच्या दोन दिवसांतच नशीब फळफळलं आणि ती कोटी रुपयांनी मालकीण बनली. आता तुम्ही म्हणत असाल की असं कसं झालं? ती कदाचित एका अब्जाधीशाची नात असेल. तर असचं काहीसं ते आहे. तिच्या लक्षाधीश आजोबांनी १० कोटी रुपयांची मालमत्ता आणि सुमारे ५२ कोटी रुपयांचा ट्रस्ट फंड तिच्या नावावर केला आहे.

स्वतःच्या कर्तृत्वावर बनली अब्जाधीश, Lady Elon Musk म्हणून होतेय वाहवा! ही महिला आहे तरी कोण?
घरात मुलांच्या जन्माने आई-वडील, आजी-आजोबांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आयुष्यातील हा उत्सव साजरा करण्यासाठी कोणतंही कुटुंब उत्सवात कसर सोडत नाही. राजे आणि सम्राटांच्या काळातही मुलांच्या जन्माचा संदेश देणाऱ्यांना सोन्याच्या अंगठ्या किंवा दागदागिने दिल्या जायच्या. पण अमेरिकेत एका मुलीच्या जन्मामुळे तिचे आजोबा इतके उत्साही झाले की त्यांनी एक बांगला, महागडी गाडी अंडी अफाट संपत्ती तिच्या नावे केली. इतकेच नाही तर आनंदी होऊन नानांनी आपल्या नातवाला ५० कोटींचा निधीही दिला. लक्षाधीश उद्योगपती बॅरी ड्रेविट-बार्लो यांनी मुलगी, सॅफ्रॉन ड्रेविट-बार्लोने एका मुलीला जन्म दिल्यावर ही घोषणा केली.


१० कोटींचा बंगला, ५२ कोटींचा फंड
५१ वर्षीय बॅरी यांनी त्यांच्या नातीच्या नावे सुमारे १० कोटी रुपयांचा आलिशान बंगला आणि ५२ कोटी रुपयांचा निधी केला आहे. मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, “आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्ही आमच्या नातीला आय दिली आहे.” विशेष म्हणजे त्यांनी आपल्या नवजात नातीला जो बंगला दिला, तो बंगला त्यांनी काही दिवसांपूर्वीच खरेदी केला होता आणि आता नवजात मुलीनुसार त्याची सजावट केली आहे.

एक फोन, दार उघडताच घाणेरड्या ब्लँकेटवर १६ महिन्यांची चिमुकली मृत, कारण ऐकून पोलिसही हादरले
कोण आहे बॅरी द्राविट-बार्लो?
बॅरी द्राविट-बार्लो इंस्टाग्रामवर स्वत:चे एक कलाकार म्हणून वर्णन करतात. एका अहवालानुसार, त्यांची सुमारे १६०० कोटी रुपयांची मालमत्ता असून ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना महागड्या भेटवस्तू देण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी गेल्या वर्षी त्यांचा नवजात मुलगा रोमियोला करोडो रुपयांची क्रूझ भेट दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here