नवी दिल्ली: भारताला आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते निराश झाले. सोशल मीडियावर धोनीचे चाहते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

वाचा-
धोनीच्या निवृत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पत्र लिहून त्याचे आभार व्यक्त केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मोंदींनी धोनीला लिहलेल्या पत्राची भरपूर चर्चा झाली होती. आता अशीच चर्चा आणखी एका धोनीच्या चाहतीची झाली आहे.

वाचा-
धोनीच्या निवृत्तीवर बाहुबली या चित्रपटात देवसेनाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अनुष्का शेट्टीने एक भावूक पोस्ट लिहली आहे. अनुष्का पोस्टमध्ये म्हणते की, तु हा विश्वास दिलास की आपण विजेते होऊ शकतो. तुझ्या नेतृत्वाखाली आपण विजेते झालो. जिंकणे ही एक सवय झाली ती तुझ्यामुळे….

वाचा-
धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीमुळे दुःख झाल्याचे अनुष्काने म्हटले आहे. धोनीने जो विजयाचा पाया रचला आहे. त्यावर भारत पुन्हा विजेता होईल अशी आशा तिने व्यक्त केली. त्याच बरोबर धोनीच्या पुढील वाटचालीसाठी अनुष्काने शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा-

वाचा-

अनुष्काने बाहुबली चित्रपटात देवसेना ही व्यक्तीरेखा साकारली होती. ती दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून बाहुबली चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर तिला भरपूर चित्रपट मिळाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here