नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सरकारला घेरण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. राहुल गांधी हे गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारवर सतत निशाणा साधत आहेत. राहुल गांधी ( ) यांनी आता राफेल विमान (rafale) सौद्यावरून शनिवारी सरकारला टीकेचं लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी टाइम्स ऑफ इंडियाची बातमी पोस्ट करत ट्विट केलंय. राफेल डीलसाठी भारताच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आला, असा आरोप राहुल गांधींनी ट्विटमधून केला. तर राहुल गांधींच्या आरोपाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही लगेच पलटवार केला.

टाइम्स ऑफ इंडियाचे वृत्त

राहुल यांच्या आरोपावर यांनी उत्तर दिलं. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका या मुद्द्यावर काँग्रेसने लढवाव्यात, असं आवाहन गोयल यांनी दिलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्ताचा उल्लेख करत राहुल गांधींनी ट्विट केले होते. ‘राफेल सौद्यात भारताच्या तिजोरीवर डल्ला मारला गेला, असं म्हणत राहुल गांधींनी महात्मा गांधींचा एक विचारही लिहिला. सत्य एक आहे, मार्ग बरेच आहेत, असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय.

‘आपल्या वडिलांची पापं धुण्यासाठी राहुल गांधी राफेलचा मुद्दा उचलून धरत आहे. पण यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. पण जर कोणी स्वतःच्या विध्वंसची वाट पहात असेल तर आम्ही कोणाकडे तक्रार करणार? असं राहुल गांधींचे बरेच सहकारी खासगीत बोलत आहे’, असा पलटवार गोयल यांनी केला.

२०२४ च्या निवडणुकीचे दिले आव्हान

राफेल मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी २०२४ ची लोकसाभा निवडणूक लढवावी, असं म्हणत गोयल यांनी आव्हान दिलं. विशेष म्हणजे राहुल गांधींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत राफेल विमान सौद्या हा प्रमुख मुद्दा बनवला होता. यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला होता. पण या निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं.

काय आहे कॅगचं प्रकरण?

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी सरकारला संरक्षण ऑफसेट कराराचा कामगिरी अहवाल सादर केला. पण या अहवालात राफेल विमान सौद्याचा उल्लेख नसल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं. सरकार हा अहवाल संसदेत सादर करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने ऑडिटरला राफेल ऑफसेटशी संबंधित कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

तीन वर्षानंतर माहिती उघड होईल

राफेल बनवणाऱ्या फ्रान्सच्या डॅसॉल्ट एव्हिएशन कंपनीने करार करताना विमानाच्या सौद्याची माहिती तीन वर्षानंतर जाहीर करण्याची अट घातली आहे. हेच वृत्त पोस्ट करत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here