नागपूर: व्याजाने दोन लाख रुपये दिल्यानंतर मूळ रकमेसह एकूण नऊ लाख रुपये उकळणाऱ्या महिला सावकाराला गुन्हेशाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. प्रीती रायपुरे वय ३२ रा. सुभाषनगर, असे अटकेतील महिलेचे नाव आहे. एलआयसी एजंट शबनम हाफिज शेख वय २३ रा. खामला या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१९ मध्ये शबनच्या आईची प्रकृती खालावली. आईवर उपचार करण्यासाठी शबनमला पैशाची गरज होती. शबनमने प्रीतीकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले. शबनमने प्रीतीला व्याजासह दोन लाख रुपये परत केले. मात्र त्यानंतरही ठार मारण्याची धमकी देऊन प्रीतीने तिच्याकडे पैशाची मागणी केली. प्रीतीने शबनमकडून एकूण नऊ लाख रुपये उकळले.

शबनमने गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे तक्रार केली. राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे निरीक्षक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करून प्रीतीविरुद्ध प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक, महाराष्ट्र सावकारी अधिनियमांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. शनिवारी प्रीतीला अटक करण्यात आली असून रविवारी तिला न्यायालयात हजर करुन पोलिस कोठडी घेण्यात येईल.

सावकारी परवान्याचे नुतीनकरण नाही

प्रीतीकडे व्याजाने पैसे देण्याचा परवाना आहे. २०१९ मध्ये या परवान्याची मुदत संपली. मुदत संपल्यानंतर प्रीतीने परवान्याचे नुतनीकरण केले नाही. मुदत संपलेल्या परवान्याच्या आधारे ती व्याजाने पैसे देत होती,अशी माहिती गुन्हेशाखा पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here