म. टा. प्रतिनिधी, : वारजे माळवाडी येथील एका इमारतीत सुरू असणाऱ्या जुगार आड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर पळून जाताना एका व्यक्तीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जाकीर पठाण (वय ४८, रा. गोखलेनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहा जणांवर जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या ठिकाणाहून काही जणांस ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील तपोधान परिसरात एका इमारतीत जुगार सुरू होता. त्याची माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजली. त्यानंतर त्यांनी त्याची खातरजमा केली.

शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास याठिकाणी पत्यांचा जुगार सुरू होता. त्यावेळी वरिष्ठ निरीक्षक मच्छिद्र पंडित यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी काहीजण दुसऱ्या मजल्यावर गेले. पण, पोलिस आल्याचे पाहून एका व्यक्तीने पळून जाण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये पठाण हे गंभीर जखमी झाले. त्याला पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर चालक व इतर काहीजण पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी वारजे पोलिसांनी जुगाराचा गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणाहून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी वारजे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here