नवी दिल्लीः भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल. कोविशिल्ड पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत आहे. तर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकार भारतीयांना कोरोनाची मोफत लस देणार आहे.

तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीचा पहिला डोस शनिवारी दिला

‘भारत सरकारने आम्हाला विशेष निर्माण प्राधान्य परवाना दिला आहे. या अंतर्गत, आम्ही चाचणी प्रोटोकॉलची प्रक्रिया वेगवान केली आहे जेणेकरुन चाचणी ५८ दिवसांत पूर्ण होईल. अशा प्रकारे, तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीचा पहिला डोस देण्यास शनिवारपासून सुरुवात झाली आहे. दुसरा डोस २९ दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर १५ दिवसांनंतर येईल. यानंतर आम्ही कोविशिल्ड व्यावसायिक वापरासाठी बाजारात आणण्याचा विचार करत आहोत’, अशी माहिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिका-यांनी दिलीय. ‘बिझिनेस टुडे’ने वृत्त दिलंय.

१७ केंद्रांवर १६०० नागरिकांवर चाचणी

यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी ७ ते ८ महिने लागतील, असं सांगितलं जात होतं. पण ही प्रक्रिया आतापासूनच शनिवारपासूनच वेगवान करण्यात आली आहे. कोविशिल्ड लसीची चाचणी १७ केंद्रांमधील १६०० नागरिकांवर २२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये, प्रत्येक केंद्रातील सुमारे १०० नागरिकांवर कोरोना लसची चाचणी घेण्यात येत आहे.

सीरमचे अ‍ॅस्ट्रा झेनेकाकडून घेतले हक्क

ही लस सीरम संस्थेची असल्याचे सूत्रांनी सांगितलं. सीरम संस्थेने अ‍ॅस्ट्रा झेनेका (Astra Zeneca) नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे हक्क खरेदी केले आहेत. यासाठी सीरम संस्था अ‍ॅस्ट्रा झेनेकाला रॉयल्टी देईल. त्याबदल्यात सीरम संस्था ही लस भारत आणि जगातील ९२ देशांमध्ये विकेल.

केंद्र सरकार भारतीयांना मोफत लस देईल

सीरम संस्थेकडून थेट कोविशिल्ड लस खरेदी केली जाईल आणि ही लस भारतीयांना मोफत देण्यात येईल. भारत सरकार जून २०२२ पर्यंत सीरम इन्स्टिट्यूटकडून लसचे ६८ कोटी डोस खरेदी करेल. भारत सरकार राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत नागरिकांना ही लस मोफत उपलब्ध करुन देईल, असे संकेत केंद्र सरकारने दिलेत आहे.

भारताची लोकसंख्या सध्या सुमारे १३० कोटी आहे. सीरमकडून ६८ कोटी डोस खरेदी केल्यानंतर, केंद्र सरकार उर्वरित लसीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यामाने विकसित करण्यात येत असलेल्या आणि कोव्हॅक्सिन आणि खासगी फार्मा कंपनी झेडस कॅडिलाकडून विकसित करण्यात येत असलेल्या ZyCoV-D ची खरेदीचा निर्णय घेऊ शकते. पण त्यासाठी या कंपन्यांची करोना लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या पाहिजेत.

लसीची चाचणी कधी सुरू आणि केव्हा संपणार, याची माहिती भारत बायोटेकने दिलेली नाही. लसीची सुरक्षा आणि कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी त्याच्या उत्पादनात कोणताही शॉर्ट कट वापरला जाणार नाही, असं भारत बायोटेकचे सीएमडी कृष्णा एल्ला यांनी स्पष्ट केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here