म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः खेळ या प्रकारात तब्बल चार मिनिटे आणि सत्तावीस सेकंद बॉल आपल्या मांडीवर खेळवत करवीर तालुक्यातील वडणगे येथील युवकाने विश्वविक्रम केला आहे. असे या युवकाचे नाव असून तो अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. त्याच्या या विक्रमची नोंद गिनीज बुकने घेतली आहे.

लहानपणापासून फुटबॉलची आवड असलेल्या प्रणवला या खेळात आपण काहीतरी वेगळं करावं असं वाटत होते. त्यानुसार तो वडणगे फुटबॉल क्लब मध्ये सहभागी झाला. त्यानंतर त्याला फ्रीस्टाइल फुटबॉल या खेळाची माहिती मिळाली. लोंगेस्ट टाईम बॅलेंसिंग फुटबॉल या प्रकारात त्याने जागतिक विक्रम करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने माहिती घेतल्यानंतर गतवर्षी बांगलादेश येथील एका खेळाडूने चार मिनिट सहा सेकंद असा विक्रम केल्याचे समजले.

हा विक्रम मोडायचे ठरवून तो गेले वर्षभर सराव करत होता. हा खेळ कोल्हापुरात नवीन असल्याने त्याला कोणीही मार्गदर्शक मिळाला नाही. तरीही हार न मानता त्याने गुगल आणि युट्युब वर माहिती घेत एकलव्याप्रमाणे प्रशिक्षण घेतले. यामध्ये त्याला सावली केअर सेंटर मध्ये सुरू झालेल्या द ब्रिज या उपक्रमाचा उपयोग झाला. या उपक्रमातील डॉक्टरांनी त्याला शारीरिक आणि मानसिक संयम आणि एकाग्रता संदर्भात मार्गदर्शन केले.

पूर्ण तयारी झाल्यानंतर स्वातंत्र्यदिनी त्याने चार मिनिट २७ सेकंद फुटबॉल आपल्या मांडीवर खेळवत नवा विश्व विक्रम नोंदवला. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here