गुवाहाटी: भारताचे माजी सरन्यायाधीश ( and mp ) हे आसामा राज्यात भारतीय जनता पक्षाचे असू शकतील असा दावा आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते (Tarun Gogoi) यांनी केला आहे. आसाम राज्यात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. (ranjan gogoi may be claims )

गोगोई यांनी शनिवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना हा दावा केला. मला माझ्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, रंजन गोगोई यांचे नाव भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांच्या यादीत आहे. मला वाटते की त्यांना आसमाचा पुढील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जाऊ शकते, असे गोगोई म्हणाले. जर रंजन गोगोई राज्यसभेत जाऊ शकतात, तर ते भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी सहमत होऊ शकतात असे आपल्याला वाटत असल्याचेही गोगोई म्हणाले.

हे सर्व राजकारण आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबतच्या निर्णयामुळे भारतीय जनता पक्ष रंजन गोगोई यांच्यावर खूश आहे. रंजन गोगोई यांनीही राज्यसभेच्या सदस्यत्वाचा स्वीकार करून त्यांनी हळूच राजकारणात प्रवेश केला आहे, असे सांगत त्यांनी राज्यसभेत जाण्यासाठी नकार का नाही कळवला, असा सवाल तरुण गोगोई यांनी उपस्थित केला. ते अगदी सहजपणे मानवाधिकार आयोग किंवा इतर मोठ्या संस्थांचे चेअरमन बनू शकत होते. मात्र, त्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहेत आणि याच कारणामुळे त्यांनी राज्यसभेच्या खुर्चीचा स्वीकार केला, असे गोगोई म्हणाले.

आपण पुढील निवडणुकीसाठी आसाममध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसतील असे माजी मुख्यमत्री तरुण गोगोई यांनी स्पष्ट केले आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘महाआघाडी’ची निर्मिती करायची आहे. यात बद्रुद्दीन अजमल यांची ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट (AIUDF) डावे पक्ष आणि प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा गोगोई यांचा प्रयत्न आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मला आसामचा मुख्यमंत्री बनायचे नसून मला एक सल्लागार म्हणून काम करायला आवडेल, असेही गोगोई पुढे म्हणाले. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी अनेक योग्य नेते आहेत, असेही ते म्हणाले. मात्र, असे असले तरी गोगोईंसाठी आसाममध्ये समविचारी पक्षांची महाआघाडी तयार करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही. याचे कारण म्हणजे आसाम काँग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांचा अशा प्रकारच्या महाआघाडीला विरोध आहे.

क्लिक करा आणि पाहा

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here