दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याचं पाकिस्तानने आता कबूल केलं आहे. त्यामुळे दाऊदला भारतात आणा. कोणत्याही परिस्थितीत आणा, अशी मागणी रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानात असल्याची कबुली दिली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटनांवर, व्यक्तींवर बंदी, निर्बंध घातले आहेत. त्याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत दाऊद इब्राहिमचा पत्ता देण्यात आला आहे. दाऊद इब्राहिमचा पत्ता हा ‘व्हाइट हाउस, सौदी मशीदजवळ, क्लिफ्टन, कराची’ असा देण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचा दावा भारताकडून करण्यात येतो. मात्र, पाकिस्तानने हा दावा फेटाळून लावला होता. आता मात्र, ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’च्या कार्यवाहीमुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे.
वाचा:
दाऊद पाकिस्तानातच असल्याचं उघड झाल्यानंतर भारतीय मीडियाने या वृत्ताला ठळक प्रसिद्धी दिल्याने पाकिस्तानने दाऊद पाकमध्ये नसल्याचा पुन्हा कांगावा केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. दाऊदचा एकेकाळचा विश्वासू साथीदार एजाज लकडावालाने मुंबई पोलिसांच्या चौकशीत यावर्षीच्या जानेवारी महिन्यातच दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली होती. १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला दाऊद आजही कराचीतच आहे, असे सांगतानाच दाऊदच्या दोन घरांचे पत्ते लकडावालाने पोलिसांना दिले होते.
वाचा:
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times