सातारा : अपयशाने खचून न जाता प्रयत्नात सातत्य ठेवून माण तालुक्यातील उकिर्डे गावचा सुपुत्र प्रतीक प्रकाश इंदलकर याने भारतीय वन सेवा परीक्षेत देशात आठवा क्रमांक मिळवला. त्याचे हे अभिमानास्पद यश आहे. प्रतीकचे माण तालुक्यातील प्रशासकीय सेवेत असणाऱ्या सुपुत्रांनी अभिनंदन केले आहे.

प्रतीकचे माध्यमिक शिक्षण नेरुळ, मुंबई येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण चेंबूर येथे झाले. २०१७ साली त्याने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला काहीवेळा या परीक्षांमध्ये अपयश आले, तर काहीवेळा त्यांनी मुलाखतीपर्यंत धडक मारली. मागीलवेळी अगदी थोडक्यात त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. पण अपयशाने खचून न जाता त्याने प्रयत्नात सातत्य ठेवले. सरतेशेवटी त्याला त्याच्या कष्टाचे, प्रयत्नांचे फळ मिळाले आहे.

बिकट परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षणासाठी झेप, जालन्याच्या मिस्बाहचा नीट परीक्षेत डंका

प्रतीकचे वडील प्रकाश इंदलकर हे मुंबई येथील मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. तर प्रतीकची आई राजकुमारी इंदलकर या मुंबई येथे विद्याभवन शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात. त्याच्या या यशाबद्दल प्रशासकीय सेवेत असणाऱ्या माण तालुक्यातील सुपुत्रांनी अभिनंदन केले.

लेकाला सोडून घरी परतताना काळाचा घाला, माय-बापासह लेकीचा अंत; सर गेल्यानं विद्यार्थ्यांचा आक्रोश
आई-वडिलांचे आशीर्वाद व त्यांनी दिलेले पाठबळ लाख मोलाचे आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण व अविरत घेतलेल्या कष्टामुळे यशाला गवसणी घालू शकलो, असे प्रतीक इंदलकर याने सांगितले.

साखर कारखाना कर्मचाऱ्याच्या लेकाची मोठी झेप, साहिल जिल्ह्यात चमकला, आईवडिलांचे स्वप्न साकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here