काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना?
> कॅमेऱ्यासमोरील कलाकार यांना सोडून सर्वांसाठी फेस कव्हर्स/मास्क अनिवार्य
> प्रत्येक ठिकाणी ६ फुटांच्या अंतराचे पालन करावे
> मेकअप आर्टिस्ट, हेयर स्टायलिस्ट्स पीपीईचा वापर करणार
> विग, कॉस्ट्यूम आणि मेकअपची शेयपरिंग कमी करावी लागणार
> शेयर करण्याजोग्या वस्तूंचा वापर करताना ग्लोव्ह्ज घालावेत
> माइकच्या डायफ्रामशी थेट संपर्क ठेवू नये
> प्रॉप्सचा वापर कमीतकमी व्हावा, वापरानंतर सॅनिटायझेशन आवश्यक
> शूटिंगवेळी कास्ट अॅण्ड क्रू कमीतकमी असावेत
> शूट लोकेशनवर एंट्री/एग्झिटचे वेगवेगळे मार्ग असावेत
> व्हिजिटर्स/ दर्शकांना सेटवर जाण्याची परवानगी नाही
क्लिक करा आणि वाचा-
कमीच कमी संपर्क असावा, हेच लक्ष्य
एसओपी शूटिंगची स्थाने आणि इतर कामाच्या ठिकाणी योग्य ते अंतर राखले जाणे अत्यंत आवश्यक आहे, असे केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले. या बरोबरच योग्य स्वच्छता, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षात्मक उपकरणांसाठी तरतुदींसह उपायांचा समावेश आहे. कमीत कमी संपर्क, एसओपीमध्ये मूलभूत आहे, असे ट्विट जावडेकर यांनी केले आहे. कमीतकमी शारीरिक संपर्क आणि हेयर स्टायलिस्टांद्वारे पीपीई, प्रॉप्स शेयर करणे आणि इतरांमध्ये मेकअप याबाबत कलाकारांद्वारे विशेष काळजी घेतली जाणार आहे.
पाहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे ट्विट-
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times