बलरामपूर: ” या संघटनेच्या संशयित अतिरेक्याच्या घरावर छापेमारी केली. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये छापेमारी केली असून, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि हस्तगत केला आहे. दिल्लीच्या धौलाकुआं येथून आयएसच्या संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली होती. अबू युसूफ असं या संशयिताचे नाव असून, तो मूळचा बलरामपूरचा रहिवासी आहे.

अबू युसूफला दिल्लीत अटक करण्यात आली होती. हल्ल्याच्या योजना आखण्यात यशस्वी झाल्यानंतर सुसाइड बॉम्बर बनून हल्ल्याची तयारी केली होती, अशी कबुली त्याने काल दिली होती. सुसाइड बॉम्बर जॅकेट तयार केला असल्याची माहितीही त्याने दिली होती. आज केलेल्या छापेमारीत त्याचा पुरावाच अधिकाऱ्यांच्या हाती लागला. छापेमारीत मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि सुसाइड बॉम्बर जॅकेटही सापडला.

दिल्लीच्या धौलाकुआं परिसरातून अबू युसूफच्या मुसक्या आवळल्या होत्या. तो मूळचा उत्तर प्रदेशातील जिल्ह्यातील उतरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैंसाही गावचा रहिवासी आहे. गावात त्याचे कॉस्मेटिकचे दुकान आहे. त्याचे कुटुंबीय याच गावात राहतात, अशी माहिती मिळते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here